मुंबई | पासपोर्ट ऑफिस अंतर्गत पासपोर्ट ऑफिसर आणि डेप्युटी पासपोर्ट ऑफिसर (Passport Office Recruitment) पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिसूचना जारी झाल्यापासून 45 व्या दिवसापर्यंत किंवा त्यापूर्वी संबंधित कागदपत्रांसह अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे.
पदाचे नाव – पासपोर्ट ऑफिसर आणि डेप्युटी पासपोर्ट ऑफिसर
पद संख्या – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा – किमान वय मर्यादा 18 वर्षे कमाल वय 56 वर्षे
नोकरीचे स्थान – संपूर्ण भारत (Passport Office Recruitment)
अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – अधिसूचना जारी झाल्यापासून 45 व्या दिवसापर्यंत
अधिकृत वेबसाईट – www.passportindia.gov.in
PDF जाहिरात – https://workmore.in/passport-office-recruitment.pdf
शैक्षणिक पात्रता –
पासपोर्ट ऑफिसर –
इच्छुक उमेदवार मुख्य केडर किंवा डिपार्टमेंटमध्ये कायमस्वरूपी अॅनॉलॉगस पोस्टवर कार्यरत असावा किंवा, पे मॅट्रिक्सच्या लेव्हल-11 मधील पाच वर्षांच्या सेवेसह किंवा समतुल्य, पेरेंट केडर किंवा विभागात नियमितपणे नियुक्ती झालेली पाहिजे. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची पदवी आणि पासपोर्ट, कॉन्सुलर, इमिग्रेशन अॅडमिनिस्ट्रेशन, फायनान्स अकाउंट्स, व्हिजिलन्स वर्क किंवा सार्वजनिक तक्रारी इत्यादींमध्ये नऊ वर्षांचा अनुभव असावा.
डेप्युटी पासपोर्ट ऑफिसर –
इच्छुक उमेदवार मुख्य केडर किंवा डिपार्टमेंटमध्ये कायमस्वरूपी अॅनॉलॉगस पोस्टवर कार्यरत असावा किंवा, पे मॅट्रिक्सच्या लेव्हल-10 मधील पाच वर्षांच्या सेवेसह किंवा समतुल्य, पेरेंट केडर किंवा विभागात नियमितपणे नियुक्ती झालेली पाहिजे. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची पदवी आणि पासपोर्ट, कॉन्सुलर, इमिग्रेशन अॅडमिनिस्ट्रेशन, फायनान्स अकाउंट्स, व्हिजिलन्स वर्क किंवा सार्वजनिक तक्रारी इत्यादींमध्ये पाच वर्षांचा अनुभव असावा.
वेतन –
पासपोर्ट ऑफिसर – पे स्केल लेव्हल 12 नुसार 78 हजार 800 रुपये ते 2 लाख 9 हजार 200 रुपये मासिक वेतन
डेप्युटी पासपोर्ट ऑफिसर – पे स्केल लेव्हल 11 नुसार 67 हजार 700 रुपये ते 2 लाख 8 हजार 700 रुपये मासिक वेतन