पुणे | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापनेवर गट क मधील वेगवेगळ्या पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून ही पदे थेट मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करत अर्जासह मुलाखतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे. मुलाखत 9 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
इन्स्पेक्टर आणि हेल्थ असिस्टंट पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. 32 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
आरोग्य पदासाठी – 12 वी पास आणि शासनमान्य संस्थेकडून सॅनिटरी इन्स्पेक्टरची पदवी उत्तीर्ण असावा. शासकीय किंवा निमशासकीय संस्थेमध्ये समक्ष पदाच्या कामाचा कमीत कमी 6 महिन्यांचा अनुभव असावा. मान्यता प्राप्त शासकीय संस्थेची संगणक आर्हता असावी. मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे.
निरीक्षक पदासाठी – मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पडवी असावी. सॅनिटरी इन्पेक्टरची पदविका उत्तीर्ण असणे गरजेचे. यात सहा महिन्यांचा अनुभव असावा शिवाय संगणक व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
मुलाखतीसाठी उमेदवारांनी दिवंगत मधुकर पवळे सभागृह, 3 रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत, पिंपरी- 411018 या पत्त्यावर हजर रहावे.
वेतनश्रेणी –
इन्स्पेक्टर – Rs, 27,000/- per month
हेल्थ असिस्टंट – Rs. 26,000/- per month
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
PDF जाहिरात – https://shorturl.at/bouwY