मुदतवाढ | टपाल विभागात मेगाभरती; तब्बल 12,828 जागा, त्वरित अर्ज करा | Post Office Recruitment

मुंबई | भारतीय टपाल खात्यात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी (Post Office Recruitment) उपलब्ध झाली आहे. ब्रॅंच पोस्ट मास्तर आणि सहाय्यक ब्रॅंच पोस्ट मास्तर पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. एकूण 12,828 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

या पदभरतीसाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तर यासाठी 18 ते 40 ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. भारतीय टपाल खात्याने दिलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार यासाठी 22 मे 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तर 11 जून ही अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. तर 12 जून ते 14 जून 2023 दरम्यान उमेदवारांनी केलेल्या अर्जात दुरूस्ती करण्याची संधी दिली जाणार होती.

परंतु नवीन अपडेट नुसार 24 जून ते 26 जून या कालावधीत उमेदवारांना त्यांचे अर्ज फेरफार विंडोद्वारे संपादित करता येतील. ज्या उमेदवारांनी 11 जूनपर्यंत अर्ज सादर केले आहेत ते 24 जून ते 26 जूनपर्यंत त्यांचे अर्ज संपादित(एडीट) करू शकतात या भरतीसाठी पहिले अर्ज 11 जून रोजी बंद झाले होते, त्यानंतर ते 16 जूनपासून पुन्हा उघडले जातील.

उमेदवार खाली दिलेल्या सुचनांचे पालन करून अर्ज करू शकतात. भारतीय टपाल विभागाच्या या भरतीसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. पण, सर्व महिला अर्जदार, SC/ST अर्जदार, PWD अर्जदार आणि ट्रान्सवुमन अर्जदारांना फी भरण्यात सूट आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना ब्रॅंच पोस्ट मास्तर पदासाठी Rs.12,000-29,380 तर सहाय्यक ब्रॅंच पोस्ट मास्तर पदासाठी Rs.10,000-24,470 वेतन दिले जाणार आहे.

Post Office GDS 2023 – GDS Recruitment 2023.pdf
GDS भरती अधिकृत वेबसाईटhttps://indiapostgdsonline.gov.in/
Post Office अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in

image 17

Recent Articles