आकाशवाणी अंतर्गत विविध जिल्ह्यांसाठी ‘वार्ताहर’ पदांसाठी भरती | Prasar Bharati Recruitment 2023

मुंबई | सरकारी सेवा असलेल्या आकाशवाणी मुंबई (Prasar Bharati Recruitment 2023) साठी विविध जिल्ह्यासाठी वार्ताहर पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ही नियुक्ती अटी आणि शर्तीवर लागू होईल.

यासाठी मुंबई, रत्नागिरी, परभणी, नांदेड, लातूर, बीड, सांगली या जिल्ह्यांसाठी कंत्राटी तत्त्वावर (अर्धवेळ) वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले नाव, पत्ता, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी कागदपत्रांच्या छायाप्रतींसह अर्ज पाठवावा. (Prasar Bharati Recruitment 2023)

सदर पदांसाठी अर्ज जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून 15 दिवसांत (16 जून 2023) कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग, नवीन प्रसारण भवन, एच. टी. पारेख मार्ग, आकाशवाणी, मुंबई – 400020 या पत्त्यावर तसेच airnewspanel2022@gmail.com या ई-मेल वर पाठविणे आवश्यक आहे. 

शैक्षणिक पात्रता
1) पत्रकारिता किंवा जन-सज्ञांपनातील पदव्युत्तर पदविका / पदवी अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि किमान दोन वर्षाचा पत्रकारिता अनुभव.
2) उमेदवार संबंधित जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्यास असावा किंवा त्याचे निवासस्थान जिल्हा मुख्यालय/पालिका हद्दीपासून १० कि.मी. या परिघात असावे.
3) संगणकाचे तसेच वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.
4) वृत्तसंकलनासाठी स्वत:ची सामग्री आवश्यक

PDF जाहिरात & Application Form – https://prasarbharti/recruitment

image

Recent Articles