प्रसार भारती अंतर्गत नोकरीची चांगली संधी | Prasar Bharati Recruitment

नवी दिल्ली | प्रसार भारती अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे. “विपणन कार्यकारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त व्यवस्थापन संस्थेतून/विद्यापीठातून एमबीए/एमबीए (मार्केटिंग) किंवा पीजी डिप्लोमा इन मार्केटिंग.
अनुभव : प्रत्यक्ष विक्रीमध्ये किमान 1 वर्षाचा अनुभव. मीडिया संस्थेसोबत थेट विक्रीचा अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

उमेदवारांनी खालील लिंकवरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज प्रक्रिया बंद केल्यानंतर ऑनलाइन अर्जात सादर केलेल्या तपशिलांमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

PDF जाहिरातhttps://workmore.in.pdf
ऑनलाईन अर्ज कराhttps://prasarbharati/recruitment
अधिकृत वेबसाईटprasarbharati.gov.in

नवी दिल्ली | प्रसार भारती दूरदर्शन न्यूज (Prasar Bharati Recruitment) अंतर्गत पूर्णवेळ कराराच्या आधारावर व्हिडिओग्राफर पदासाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया १८ एप्रिल २०२३ पासून सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख नोटिफिकेशनच्या तारखेपासून १५ दिवसांपर्यंत आहे.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवराचे वय १८ एप्रिल २०२३ रोजी ४० वर्षापेक्षा जास्त नसावे. निवड झालेल्या उमेदवरांना नवी दिल्ली येथील कार्यालयासाठी काम करावे लागेल. या पदभरती अंतर्गत ४१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अधिकृत वेबसाईट – https://prasarbharati.gov.in/
PDF जाहिरात – https://workmore.in/Doordarshan-Recruitment-2023-Notification.pdf

शैक्षणिक पात्रता –
व्हिडिओग्राफर – उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १०+२ उत्तीर्ण असावा. तसेच त्याने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिनेमॅटोग्राफी/ व्हिडिओग्राफीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा केलेला असणं आवश्यक आहे. (Prasar Bharati Recruitment) तसेच MOJO मधील अनुभव असलेल्या आणि शॉर्ट फिल्म मेकिंग कोर्स केलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल. इच्छुक उमेदवाराला व्हिडिओग्राफी, सिनेमॅटोग्राफी किंवा अन्य समकक्ष क्षेत्रातील कामाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

पगार –
व्हिडिओग्राफर – ४० हजार रुपये मासिक मानधन

व्हिडिओग्राफर पदासाठी उमेदवारांची निवड चाचणी/मुलाखतीद्वारी केली जाईल. तसेच केवळ निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी किंवा चाचणीसाठी बोलावले जाईल.
चाचणी/मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

Recent Articles