पुणे महानगरपालिका अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी; थेट मुलाखतीव्दारे निवड | Pune Mahanagarpalika Recruitment

पुणे | पुणे महानगरपालिका अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याकडील पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, पुणे महानगरपालिका यांच्या गाडीखाना येथील प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटकरिता पुणे मनपा रुग्णालयांतील FICTC केंद्रांकडे नेमणुकीसाठी रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. 

अस्थायी पदांवर 6 महिन्यांकरिता करार पद्धतीने एकवट मानधनावर सेवा घ्यावयाची असल्याने खालील पदे तोंडी मुलाखत पद्धतीने भरणेकरिता अर्ज मागविणेत येत आहेत.

यामध्ये “समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ” पदांच्या 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सक्षम पद्धतीने सादर करायचा आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 8 दिवसांपर्यंत सोमवार ते शुक्रवार (शासकीय सुट्टी वगळून) सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत समक्ष अर्ज सादर करावयाचा आहे.

यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, पहिला मजला, 663, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे 411002 या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

PDF जाहिरात – https://shorturl.at/rtWRT
अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in


Pune Mahanagarpalika Recruitment | पुणे महानगरपालिका ऑनलाइन परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात; 320 जागांसाठी 10 हजार 171 अर्ज

पुणे | महापालिकेतील दुसऱ्या टप्प्यातील ३२० जागांसाठी वर्ग 1, वर्ग 2 आणि वर्ग 3 मधील रिक्त पदांसाठी भरती अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून जूनच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाइन परीक्षा होणार आहे.

या ऑनलाईन परीक्षेचे हॉल तिकीट उमेदवार खालील लिंक द्वारे डाउनलोड करू शकता…हॉल तिकीट परीक्षेच्या 15 दिवसांच्या आधी प्रकाशित केले जाईल.

महापालिकेतील दुसऱ्या टप्प्यातील 320 जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या नोकर भरतीसाठी 10 हजार 171 अर्ज आले आहेत. यामध्ये वर्ग एकच्या वर्ग दोनमधील 23, वर्ग तीन मधील 289 जागांचा समावेश आहे. तर सर्वात तीव्र स्पर्धा मिश्रक/औषध निर्माता या पदाच्या एका जागेसाठी 202 जण स्पर्धेत आहेत. कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदाच्या एका जागेसाठी 167 जणांचे अर्ज आलेले आहेत.

पुणे महापालिकेने 2022 मध्ये 448 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर आता 2023 मध्ये 320 पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिकेतर्फे वर्ग 1, वर्ग 2 आणि वर्ग 3 मधील रिक्त पदांसाठी सरळ सेवा प्रवेशाने आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन विभागातील पदे भरण्यात येणार आहेत.

त्यासाठी पालिकेने ऑक्टोबर 20222 मध्ये 448 जागांसाठी पहिल्या टप्प्यात भरती प्रक्रिया राबविली होती. आयबीपीएस या संस्थेशी करार करून ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली गेली.


Recent Articles