पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत ७५ रिक्त जागांची भरती; जाणून घ्या सर्व माहिती | Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment

पुणे | पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन (Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment) अंतर्गत पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि. पुणे येथे “लेखनिक” पदाच्या 75 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – लेखनिक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – पुणे

वयोमर्यादा – 28 वर्षे
परीक्षा शुल्क – परिक्षा फी रु. १०००/- अधिक १८% जीएसटी एकूण रु. ११८०/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 एप्रिल 2023 

अधिकृत वेबसाईट – www.punebankasso.com
PDF जाहिरात shorturl.at/wBVY9 (Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment
ऑनलाईन अर्ज कराhttps://rb.gy/lyyfgk

शैक्षणिक पात्रता –
लेखनिक –
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व एम. एस. सी. आय. टी. / समतुल्य अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण प्राधान्य – व्दिपदवीधर, जे. ए. आय. आय. बी. / सी. ए. आय. आय. बी. / जी. डी. सी. अँड ए. उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त बैंकिंग, सहकार, कायदे विषयक पदविका

वेतनश्रेणी –
लेखनिक –
नियुक्तीनुसार २ वर्षे प्रशिक्षण कालावधी राहील प्रथम वर्ष रु. १२,०००/- व व्दितीय वर्षी रु. १५,०००/- प्रशिक्षण भत्ता / मेहनताना देण्यात येईल.प्रशिक्षण कालावधी यशस्वीरिता पूर्ण केलेल्या उमेदवारांना १ वर्ष पोबेशन कालावधी देण्यात येईल. प्रोवेशन काळात बँकेच्या नियमानुसार रु. १८,०००/- वेतन देण्यात येईल

Recent Articles