खासगी कंपन्यांमध्ये 500 हून अधिक रिक्त जागांसाठी भरती; त्वरित नोंदणी करा | Ratnagiri Job Fair 2023

रत्नागिरी | जिल्ह्यातील बेरोजगार तरूण – तरूणींसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. विविध खासगी कंपन्या, आस्थापनांमध्ये 500 हून अधिक रिक्त पदे असून त्याकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित केला आहे. (Ratnagiri Job Fair 2023)

बुधवारी (ता. २४) सकाळी १० वा. नाचणे रोड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) मेळावा होणार आहे. शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने हा मेळावा महत्वाचा ठरणार आहे. (Ratnagiri Job Fair 2023)

पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या पुढाकारातून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा होणार आहे. (Ratnagiri Job Fair 2023)

या मेळाव्याकरिता विविध खासगी आस्थापनांकडून 500 हून अधिक रिक्त पदे आहेत. यासाठी दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, अभियंता तसेच इतर शैक्षणिक पात्रता असणाऱ्या बेरोजगारांना या मेळाव्याचा लाभ घेता येणार आहे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता बायोडाटा व इतर कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींनी २४ मे रोजी रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे असे आवाहन सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.

Recent Articles