मुंबई | RAW एजंट अर्थात रिसर्च अँड ऍनालिसिस विंग एजंट कोण असतात आणि त्यांच काम काय असते हे आपल्यापैकी बहुतांश लोकांना माहिती आहे. भारताच्या गुप्तचर विभागा अंतर्गत नेमणूक असलेल्या या RAW एजंटना भारतावर येणाऱ्या परकीय शत्रूंच्या तसेच अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीतील संकटांवर नजर ठेऊन त्याची माहिती गुप्तचर विभागाला किंवा सैन्याला देण्याची जबाबदारी असते. (RAW Agent career)
RAW ऑफिसर्सबद्दल आधीपासूनच खूप गुप्तता बाळगली जाते. त्यामुळे सर्वांना प्रश्न पडतो की RAW AGENTS ना पगार किती मिळतो, आणि त्यांना कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात? चला तर मग जाणून घेऊया RAW AGENTS ला किती पगार असतो आणि त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात. (RAW Agent career)
RAW एजंटना मिळणारा पगार
अनुभव आणि जोखीमीच्या कामाच्या पार्श्वभूमीमुळे RAW एजंटना मासिक रु. 80,000 ते रु. 1 लाख 03 हजारापर्यंत वेतन असते. RAW एजंटचे वेतन दरवर्षी रु.9.60 लाख ते रु.15.60 लाखांपर्यंत असते.
RAW एजंटला मिळणाऱ्या सवलती
- RAW एजंटला सुरक्षा भत्ते मिळतात जे मूळ वेतन, एकूण उत्पन्न आणि महागाई भत्त्यांपेक्षा जास्त असतात.
- RAW एजंटना प्रति आर्थिक वर्षात 2 महिने अतिरिक्त वेतन मिळते.
- परदेशातील कामगिरीसाठी नियुक्त केलेल्या RAW कर्मचाऱ्यांना परदेशी सेवा भत्ता आणि DA मिळतो.
- विभागाद्वारे हार्डशिप पोस्टिंग म्हणून वर्गीकृत केलेल्या पोस्टिंगला कष्ट भत्ता मिळतो.
- RAW अधिकारी त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी सिंगापूर, युनायटेड स्टेट्स किंवा युरोपियन देशात पाठवू शकतात.
- त्यांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठ/शाळेत प्रवेश मिळू शकतो आणि एजन्सी सर्व खर्चाची काळजी घेते.
RAW एजंट होण्यासाठी पात्रता
- उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- अर्जदाराचे इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व असावे.
- उमेदवाराला कॉम्प्युटर ऑपरेशन आणि कॉम्प्युटर भाषेचे ज्ञान असावे.
- अर्जदाराचा कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा.
RAW एजंट्ससाठी हे स्किल्स आवश्यक
- उमेदवाराकडे दीर्घ कालावधीसाठी काम करण्याची क्षमता हवी.
- उमेदवाराकडे जास्त अंतराचा प्रवास करण्याची क्षमता हवी.
- उमेदवाराकडे मूलगामी आणि तार्किक विचार करण्याती क्षमता हवी.
- उमेदवाराची निर्णय क्षमता जलद असावी.
- उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा, जेणेकरून तो/ती सर्व शारीरिक क्रियाकलाप करू शकेल.
- उमेदवाराची नेहमी प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची तयारी असावी.
- उमेदवार अत्यंत गुप्तरित्या कार्य करू शकणारा असावा.
- उमेदवारांकडे अंतर्ज्ञानी आणि चपळतेचा गुणधर्म असावा.