डेटा एंट्री ऑपरेटर, शिपाई व इतर विविध पदांसाठी नोकरी; महिला व बालविकास महामंडळात भरती | Rural Women and Child Development Board Recruitment

पुणे | ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ, पुणे अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार एकूण 21 रिक्त जागा भरल्या (Rural Women and Child Development Board Recruitment) जाणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2023 आहे.

या पदभरती अंतर्गत  “क्षेत्र प्रकल्प अधिकारी, HRM प्रकल्प अधिकारी, MIS प्रकल्प अधिकारी, क्षेत्र पर्यवेक्षक, डेटा व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर, परिचर/ शिपाई” पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. तरी उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावेत. (Rural Women and Child Development Board Recruitment)

या पदभरतीसाठी वयोमर्यादेचा विचार करता क्षेत्र प्रकल्प अधिकारी, HRM प्रकल्प अधिकारी पदासाठी 30 ते 45 वर्षे, MIS प्रकल्प अधिकारी, क्षेत्र पर्यवेक्षक, डेटा व्यवस्थापक पदासाठी 25 ते 42 वर्षे आणि डेटा एंट्री ऑपरेटर, परिचर/ शिपाई पदासाठी 21 ते 35 वर्षे इतके निश्चित करण्यात आले आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप. मुख्य कार्यकारी अधिकारी” ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ मुख्य कार्यालय, “जन्मनागल” बँक ऑफ महाराष्ट्र बिल्डिंग”, 3रा मजला S.NO.7A/2, हडपसर औद्योगिक वसाहत, पुणे 411 013.

अधिकृत जाहिरात Click Here to download
अधिकृत वेबसाईटgmbvm.in

Recent Articles