सहकार आयुक्तालय विभाग अंतर्गत 751 पदांची भरती; जाणून घ्या सविस्तर | Sahakar Ayuktalay Bharti 2023

पुणे | राज्याच्या सहकार आयुक्तालयात (Sahakar Ayuktalay Bharti 2023) लिपिक व टंकलेखकांची भरती केली जाणार आहे. सहकार आयुक्तालयांतर्गत एकूण 751 जागांची भरती केली जाणार असून, त्यापैकी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक व टंकलेखक पदाच्या 448 जागांची भरती होणार आहे.

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाटस्अप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा.

15 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती आयुक्तालयातून देण्यात आली. शासनाच्या 30 सप्टेंबर 2022 च्या निर्णयानुसार ज्या विभागाचा आकृतिबंध (स्टाफिंग पॅटर्न) मंजूर आहे, अशा विभागातील रिक्त जागांपैकी शंभर टक्के तर उर्वरित विभागांपैकी 80 टक्के पदभरतीस (Sahakar Ayuktalay Bharti 2023) मान्यता देण्यात आली आहे.

सहकार विभागातील लिपिक व टंकलेखक पदांची मिळून 366 पदे आणि लेखापरीक्षकांची 82 मिळून एकूण 448 पदांची भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केली जाणार आहे. (Sahakar Ayuktalay Bharti 2023)

त्यामध्ये सहकार आयुक्तालयात 26, मुंबई- 36, कोकण -25, पुणे -38, कोल्हापूर -30, औरंगाबाद -33, नाशिक- 66, लातूर- 36, अमरावती- 33, नागपूर- 43 लिपिकांच्या तर लेखापरीक्षकांमध्ये मुंबईतील 29, पुणे -17, कोल्हापूर- 9, औरंगाबाद -19, नाशिकमधील 8 पदांचा समावेश आहे.

त्याबाबत राज्यातील सर्व विभागीय सह निबंधकांनी त्यांच्याकडील प्रशासन व लेखापरीक्षकांची सरळसेवा बिंदूनामावलीनुसार आरक्षणानुसार पदे निश्चित करावीत आणि त्यानुसारचे मागणीपत्र सहकार आयुक्तालयात पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसारचा प्रस्ताव आयुक्तालयाने शासनास 15 डिसेंबर 2022 रोजी पाठविला आणि शासनाने तो आयोगास दिला आहे.

गट ‘क’ संवर्गातील 303 पदे
सहकार विभागातील गट ‘क’ संवर्गातील 303 पदांच्या भरतीसाठी आयुक्तालयाने टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसबरोबर करार केला असून 15 ऑगस्टपूर्वी ही नोकरभरती प्रक्रिया पूर्ण होईल. या पदांमध्ये उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, सहकार अधिकारी श्रेणी एक व सहकार अधिकारी श्रेणी दोन, वरिष्ठ लिपिक, सहायक सहकार अधिकारी, लघुटंकलेखक आणि लेखापरीक्षक श्रेणी दोन या पदांचा समावेश आहे.

गट ‘क’ संवर्गातील पदांमध्ये सहकार आयुक्तालय मुख्यालयात 29, पुणे -23, कोल्हापूर -26, अमरावती -36, औरंगाबाद -24, नाशिक -40, कोकण -27, मुंबई- 23, लातूर -30, नागपूर- 38 आणि लेखापरीक्षकांची 7 पदे नाशिक जिल्ह्यासाठी भरण्यात येतील. त्यासाठी ऑनलाइन पध्दतीने परीक्षा होणार असून, त्याची प्रक्रिया पूर्ण होताच कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दैनिक पुढारीने याबाबत वृत्त दिले आहे.

Recent Articles