Career

मुदतवाढ: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभागात टंकलेखक, गृहपाल, निरीक्षकसह अन्य विविध पदांची भरती | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

पुणे | समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (Samaj Kalyan Vibhag Bharti 2024) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत गट क संवर्गामधील पदांची भरती केली जाणार आहे. 

या भरती अंतर्गत, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक पदांच्या 219 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 10 ऑक्टोबर 2024. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर ऐवजी 30 नोव्हेंबर 2024 करण्यात आली आहे. 

  • पदाचे नाव – गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक
  • पदसंख्या – 219 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज शुल्क – 
    • खुला प्रवर्ग: रु. 1000/-
    • राखीव श्रेणी: रु. 900/-
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट –  https://sjsa.maharashtra.gov.in/en
Important Links
 PDF जाहिरातSamaj kalyan vibhag bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराonlime application
अधिकृत वेबसाईटhttps://sjsa.maharashtra.gov.in/en
पदाचे नावपद संख्या 
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक05
गृहपाल (महिला)92
गृहपाल (सर्वसाधारण)61
समाज कल्याण निरीक्षक39
उच्चश्रेणी लघुलेखक10
निम्नश्रेणी लघुलेखक03
लघुटंकलेखक09
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकअ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक  शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य)ब) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
गृहपाल (महिला)अ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य)ब) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
गृहपाल (सर्वसाधारण)अ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य)ब) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
समाज कल्याण निरीक्षकअ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य)ब) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उच्चश्रेणी लघुलेखकअ) शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.ब) १. उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्रमंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा २. उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण.वरील “ब” मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १२० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य)क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिट किंवाड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिटइ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
निम्नश्रेणी लघुलेखकअ) शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.ब) १. निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा२. उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण.वरील “ब” मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १०० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य)क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिटं किंवाड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिटइ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
लघुटंकलेखकअ. शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.२. लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असले पाहीजे. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र

सदर पदाकरिता अर्ज ऑनलाईनपद्धतीने करायचा आहे. उमेदवारानी विहीत प्रपत्रामध्ये पूर्ण तपशिल भरुन अर्ज सादर करावा. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

Back to top button