SBI Recruitment 2023 | एसबीआय मध्ये 1000 हून अधिक पदांची थेट मुलाखतीव्दारे भरती

मुंबई | देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत सरकारी नोकरीची संधी (SBI Recruitment 2023) उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर आणि सपोर्ट ऑफिसर या पदांसाठी ही संधी आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 1031 रिक्त पदांची भरती केली जाणार. स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा इतर कोणत्याही सरकारी बँकेचे कर्मचारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. (SBI Recruitment 2023)

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहू शकता. अधिसूचनेनुसार, चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर पदासाठी 821 रिक्त जागा आहेत. तर चॅनल मॅनेजर सुपरवायझर पदासाठी 172 आणि सपोर्ट ऑफिसर पदासाठी 38 जागा रिक्त आहेत.

किती मिळेल वेतन?
चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर – 36000 रुपये
चॅनल मॅनेजर सुपरवायझर – 41000 रुपये
सपोर्ट ऑफिसर – 41000 रुपये

निवड कशी होणार?
स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. प्राप्त झालेल्या अर्जांपैकी उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. मुलाखत 100 गुणांची असणार आहे. मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम यादी तयार केली जाईल.

भरतीसाठी अधिकृत अधिसूचना पहा – SBI Recruitment 2023

Recent Articles