मुंबई | नोकरीच्या शोधात असाल तर नक्कीच ही माहिती तुमच्यासाठी उपयोगाची आहे. कारण सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई अंतर्गत नोकरीची (SEEPZ Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
“मूल्यमापनकर्ता (कस्टम्स), प्रतिबंधक अधिकारी (कस्टम्स), परीक्षक (कस्टम्स)” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज (SEEPZ Recruitment) मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुन 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी असून इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेल्या PDF मध्ये याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्यावी. त्यानंतर विकास आयुक्त, SEEPZ विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, SEEPZ सेवा केंद्र इमारत, अंधेरी (पू), मुंबई-400096 या पत्यावर आपले पूर्ण तपशिल आणि योग्य ती कागदपत्रे जोडलेले अर्ज पाठवावेत.
वेतन –
– मूल्यमापनकर्ता (कस्टम्स) रु. 9300-34800/-) ग्रेड पे रु. 4600/- 7 व्या CPC अंतर्गत पे मॅट्रिक्सच्या स्तर 7 च्या समतुल्य
– नियम अधिकारी (कस्टम्स) रु. 9300-34800/-) ग्रेड पे रु. 4600/- 7 व्या CPC अंतर्गत पे मॅट्रिक्सच्या स्तर 7 च्या समतुल्य
– परीक्षक (कस्टम्स) रु. 9300-34800/-) ग्रेड पे रु. 4600/- 7 व्या CPC अंतर्गत पे मॅट्रिक्सच्या स्तर 7 च्या समतुल्य.
PDF जाहिरात – https://workmore.in/advt.pdf
अधिकृत वेबसाईट – seepz.gov.in