SRPF Nagpur Recruitment | राज्य राखीव पोलीस दल अंतर्गत रिक्त जागांची भरती; आज मुलाखती

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राज्य राखीव पोलीस दल नागपूर अंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल मॉन्टेरसी स्कूल ग्रुप केन्द्र येथे (SRPF Nagpur Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

प्रशिक्षित शिक्षिका आणि आया पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 & 27 मे 2023 (पदांनुसार) आहे.

शैक्षणिक पात्रता –
प्रशिक्षित शिक्षिका – मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र आहे आणि जे.बी.टी./पदवी, पदव्युत्तर (SRPF Nagpur Recruitment)
आया – किमान शैक्षणिक पात्रता आठवी पास आहे, जी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतील असावी.

अधिकृत वेबसाईटnagpur.gov.in

Recent Articles