सरकारी नोकरीच्या (Government Jobs) शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. मिळालेल्या नवीन अपडेट नुसार एकत्रित संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षेतून होणाऱ्या भरतीमधील पदांची संख्या वाढवण्यात आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी या परीक्षेतून 1600 पदांवर भरती घेण्यात येणार होती, मात्र आता ही भरती 4522 पदांसाठी होणार आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना, कर्मचारी निवड आयोग (SSC CHSL Recruitment- Government Jobs) विविध सरकारी मंत्रालये, विभाग आणि कार्यालय अंतर्गत नोकरीची ही संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गत निम्न विभागीय लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. पदे भरली जाणार असून एकूण 4522 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 8 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता –
निम्न विभागीय लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. (SSC CHSL Recruitment)
डेटा एंट्री ऑपरेटर –
(DEO) मान्यताप्राप्त मंडळाकडून गणित विषयासह विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष.
वेतनश्रेणी –
निम्न विभागीय लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – Pay Level-2 (Rs.19,900-63,200). (SSC CHSL Recruitment)
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) – Pay Level-4(Rs. 25,500-81,100) and Level-5(Rs. 29,200-92,300).
अर्ज शुल्क –
जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु. 100/-
SC/ST/PwD – रु. 0/-
पेमेंटची पद्धत – ऑनलाइन (SSC CHSL Recruitment)
अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in (SSC CHSL Recruitment)
PDF जाहिरात – shorturl.at/enNZ0