मुंबई | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी भारतीय सर्वेक्षण विभाग अंतर्गत नोकरीची (Survey Of India Bharti 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या विभागाअंतर्गत “मोटार चालक सह मेकॅनिक” पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या भरती अंतर्गत पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.
या पदभरतीसाठी वयोमर्यादा सर्वसाधारण श्रेणीतील अर्जदारांसाठी 18 ते 27 वर्षे, SC/ST उमेदवारांसाठी 18 ते 32 वर्षे आणि इतर मागासवर्गीयांसाठी – 18 ते 30 वर्षे (OBC) निश्चित करण्यात आली आहे. (Survey Of India Bharti 2023)
अधिक माहितीसाठी अर्जदारांनी https://workmore.in/advt.pdf वाचावी. तसेच इतर माहितीकरिता विभागाच्या www.surveyofindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.