नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कं. प्रा. लि. ठाणे अंतर्गत नोकरीची (SWDICPL Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गत मुख्य वित्त अधिकारी पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (SWDICPL Recruitment)
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 24 मे 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता व्यवस्थापकीय संचालक, स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर के.प्रा. लि., वरदान कमर्शिअल कॉम्प्लेक्स, ९ वा मजला, एम. आय. डी. रोड नं. १६. वागळे इस्टेट, ठाणे (प) ४००६०४ असा आहे.
शैक्षणिक पात्रता –
मुख्य वित्त अधिकारी –
1. महाराष्ट्र शासन सेवेतील लेखा संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी
2. मराठी /इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे.
3. सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी शारीरिक, मानसिक या आरोग्याच्या दृष्टीने सुधृढ असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी सक्षम असावा. (SWDICPL Recruitment)
4. अर्जदार सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे वय अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.