TCS Recruitment 2023 | टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये तब्बल 40,000 फ्रेशर्सची भरती; संधी चुकवू नका

मुंबई | जगभरात असलेल्या मंदीच्या सावटामुळे अनेक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे, तर काहीजणांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार आहे. एकीकडे जगभरातील विविध कंपन्यांमधून लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असताना देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) मात्र नोकरीच्या शोधात असलेल्या फ्रेशर्ससाठी (TCS Recruitment) मोठी घोषणा केली आहे. चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, कंपनीचे चीफ एचआर ऑफिसर मिलिंद लक्कड यांनी कंपनी 2023-24 या आर्थिक वर्षात 40 हजार फ्रेशर्सना नियुक्त करण्याची योजना आखत असल्याची त्यांनी माहिती दिली.

2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीनं तब्बल ४४ हजार फ्रेशर्सची नियुक्ती केली आहे. याशिवाय अनुभवी व्यावसायिकांची विक्रमी नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही लक्कड यांनी दिली. ऑफर केलेल्या सर्व फ्रेशर्सना कंपनीकडून  (TCS Recruitment) नक्की नोकरी मिळेल. त्यासाठी ऑन बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 6 लाखांवर
TSC मध्ये आर्थिक वर्ष 2023 मधील निव्वळ आधारावर 22600 कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. आता एकूण हेड काऊंट 6 लाख 14 हजार 795 झाला आहे. कंपनीनं 53 हजारांहून अधिक क्लाउड सर्टिफिकेशनचा आकडा ओलांडल्याचे लक्कड म्हणाले. यासह आता एकूण ऑर्गेनिक डेव्हलपमेंट 1 लाख 10 हजारांच्या पुढे गेली आहे.

फ्रेशर्सची मोठी भरती
कर्मचारी भरतीची प्रक्रिया थोडी संथगतीने झाली असली तरी सध्या, बहुतेक 0-3 वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचार्‍यांची भरती केली जात असल्याचं लक्कड यांनी सांगितलं. चौथ्या तिमाहीत करानंतरचा नफा म्हणजेच PAT 14.8 टक्क्यांच्या वाढीसह 11392 कोटी रुपये झाला आहे. वार्षिक आधारावर महसूल 16.9 टक्क्यांच्या वाढीसह 59162 कोटी रुपये राहिला.


TCS Recruitment | टीसीएस मध्ये नोकरीच्या विविध संधी | त्वरित अर्ज करा

मुंबई | जगभरातील मोठ-मोठ्या आयटी कंपन्या महागाई आणि अमेरिकेतील मंदीमुळे बेजार झालेल्या असताना भारतीय आयटी कंपन्या मात्र आपली ग्रोथ टिकवून आहेत. त्यामुळेच जागतिक मंदीच्या समस्यांमध्येही भारतीय आयटी क्षेत्रात नोकरीच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टीसीएस कंपनीत मोठ्या प्रमाणात नोकरीची (TCS Recruitment) संधी उपलब्ध आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तुम्हाला कामाचा अनुभव असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध आहे. ‘टेकगिग’ने नुकतेच याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

टीसीएस (TCS Recruitment) भरती

TCS आपल्या ऑफिसेसमध्ये अँग्युलर डेव्हलपर पदासाठी कर्मचारी भरती करत आहे. ही पदे सध्या बेंगलूर ऑफिससाठी भरली जात आहेत. तसेच ज्या उमेदवारांना याव्यतिरिक्त ठिकाणांसाठी TCS मधील नोकरीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी ख़ाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्यासाठी योग्य ती पोस्ट शोधून त्याप्रमाणे अर्ज़ करावा.

अँग्युलर डेव्हलपर पदाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या (TCS Recruitment)

1. अँग्युलर 6 आणि त्यापेक्षा जास्त स्तरांबाबत सखोल ज्ञान आणि डेव्हलपमेंटचा अनुभव आवश्यक आहे.
2. HTML5, CSS3, JSON या वेब तंत्रज्ञानामध्ये आणि क्रॉस-ब्राउझरशी सुसंगत कोड लिहिण्यात निपुण असणं आवश्यक.
3. टाइपस्क्रिप्ट डोम मॅनिप्युलेशन तंत्र आणि रेस्टफुल सेवांची चांगली समज आवश्यक.
4. आधुनिक MV-VM/MVC फ्रेमवर्कपैकी कोणत्याही एकामध्ये तज्ज्ञ असणं गरजेचं.
5. अँगुलर अ‍ॅप्लिकेशन्स आणि डिरेक्टिव्हची अंमलबजावणी करण्याचा अनुभव आवश्यक.

TCS पदभरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खालील लिंक्सचा वापर करावा.

1. TCS Careers
2. TCS Lateral Hiring
3. Entry Level – Tata Consultancy Services
4. TCS Internship Program

Recent Articles