WFH बाबत TCS ने घेतला महत्वाचा निर्णय; होणार कडक अंमलबजावणी | TCS Work From Home

मुंबई | देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेसने (TCS) वर्क फ्रॉम होम बाबत मोठा निर्णय घेतला असून Work from Home करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेमो पाठवण्यास सुरवात केली आहे.

टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेसने (TCS) अशा कर्मचाऱ्यांना मेमो (Memo) पाठवायला सुरूवात केली आहे जे महिन्यातून कमीत कमी 12 दिवस ऑफिसमधून काम करत नाहीत. अशा कर्मचाऱ्यांना कंपनीने मेमोमध्ये सांगितले आहे की, नियमांचे पालन न केल्यास शिस्तभंगाची कार्यवाही (Disciplinary Proceedings) सुरू केली जाईल. ताबडतोब ऑफिसमधून काम करणे सुरू करा अशा सुचना मेमोमध्ये देण्यात आल्या आहेत.

कोरोना काळात देश-विदेशी कंपन्यांनी वर्क-फ्रॉम होमची सुविधा दिली होती. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर कंपन्यांनी पुन्हा ऑफिस सुरु केले पण बहुतेक कर्माचारी ऑफिसमध्ये जात नाहीत. त्याऐवजी ते घरूनच काम करणे पसंत करतात. याबाबत कंपनी मॅनेजमेंट आणि कर्मचाऱ्यांमध्ये ओढाताण सुरू आहे.

टीसीएस कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करायचे नसेल तर ते पाच दिवस आधी विंनती करू शकतात. एचआर सिस्टीम कोणत्याही जुन्या तारखेच्या वर्क फ्रॉम होमसाठीचा अर्ज स्विकारणार नाही. कंपनीने मेडिकल एमरजन्सीशिवाय वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन दिले जाणार नाही असे सांगितले होते.

टीसएसने ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आमच्या कँपसमध्ये उत्साही वातावरण पाहून प्रोत्साहित झालो आहोत आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी या व्हायब्रंड इकोसिस्टीमचा भाग व्हावे अशी आमची इच्छा आहे. मा

मागील दोन वर्षात कँम्पसमध्ये मोठ्या संख्येने नवीन कर्मचारी टीसीएसमध्ये सहभागी झाले आहे. कंपनीची अशी इच्छा आहे की ”त्यांनी टीसीएसच्या सहकार्यांने नवीन गोष्टी शिकाव्या, नवीन अनुभवांनी समृद्ध व्हावे आणि एकत्र काम करण्याची मजा अनुभवावी.” असे म्हणटले आहे.

Recent Articles