Career

Tesla Walking Job : चाला & दिवसाला 28 हजार रुपये कमवा! टेस्लाची अनोखी नोकरी.. ऑफर एकदा बघाच

जगप्रसिध्द इलेक्ट्रिक वाहन निर्माता टेस्लाने एका अत्यंत अनोख्या नोकरीची जाहिरात केली आहे. कंपनी अशा व्यक्तींचा शोध घेत आहे ज्यांना दिवसभर चालण्याची आवड आहे. होय, तुम्ही बरोबर वाचत आहात! टेस्ला आपल्या ऑप्टिमस रोबोटच्या विकासासाठी मोशन कॅप्चर डेटा गोळा करण्यासाठी उमेदवारांची भरती करीत आहे.

काय आहे ही नोकरी?

या नोकरीचे नाव ‘डेटा कलेक्शन ऑपरेटर’ असून यात सात तासांपेक्षा जास्त वेळ एक विशेष प्रकारचा सूट आणि व्हर्च्युअल रियॅलिटी हेडसेट घालून विशिष्ट मार्गक्रमण (Tesla Walking Job) करावे लागेल. या कामासाठी टेस्ला तासाला ४८ डॉलर म्हणजेच जवळपास ४००० रुपये देत आहे. याशिवाय डेटा गोळा करणे, अहवाल लेखन आणि काही साध्या उपकरणांचे काम देखील यात समाविष्ट आहे.

काय आहेत पात्रता?

या नोकरीसाठी उमेदवारांची उंची ५ फूट ७ इंच ते ५ फूट ११ इंच असणे आवश्यक आहे. त्यांना ३० पाउंडपर्यंत वजन उचलता येणे आवश्यक आहे आणि त्यांना दीर्घ कालावधीसाठी व्हीआर हेडसेट वापरण्यात काही अडचण नसावी.

काय आहेत फायदे?

या नोकरीसोबत टेस्ला अनेक आकर्षक फायदे देत आहे. यात आरोग्य, दंत आणि दृष्टी विमा, कुटुंब नियोजन सहाय्य, निवृत्ती वेळेसाठी बचत योजना, टेस्ला बेबीज प्रोग्राम, वजन कमी करण्याचे आणि धूम्रपान बंद करण्याचे प्रोग्राम आणि विविध प्रकारचे विमा पर्याय यांचा समावेश आहे.

कसे करावे अर्ज?

ही नोकरी कालिफोर्नियातील पालो अल्टो येथे उपलब्ध आहे. टेस्लाने ही नोकरी तीन शिफ्टमध्ये काढली आहे. नोकरीची सर्व माहिती टेस्लाच्या करिअर पेजवर (Tesla Career) पाहता येईल.

का आहे ही नोकरी महत्त्वाची?

ही नोकरी रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात काम करण्याची एक उत्कृष्ट संधी आहे. टेस्लाच्या ऑप्टिमस रोबोटचा वापर भविष्यात कारखान्याच्या कामकाजापासून ते रुग्णसेवेपर्यंत अनेक क्षेत्रात होऊ शकतो.

Back to top button