ठाणे महानगरपालिकेत 1738 पदांची भरती | Thane Mahanagarpalika Bharti 2023

नवीन जाहिरात प्रकाशित वाचा

मुंबई | ठाणे महानगरपालिकेतील रखडलेल्या पदभरतीला अखेर मंजूरी मिळाली असून जवळपास १७३८ पदांसाठी पदभरती केली जाणार आहे. वास्तविक ठाणे महापालिकेत जवळपास ४० टक्के जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षापासून पालिकेतील शेकडो अधिकारी, कर्मचारी निवृत्त होत असल्याने त्यांचीही पदे रिक्त आहेत.

नवीन पद भरती करताना आस्थापनाचा खर्च ३५ टक्क्याहून कमी असावा असा नियम असल्याने अत्यावश्यक सेवेची ८८० पदे भरण्यासाठी शासनाची मंजुरी मिळूनही ठाणे पालिका प्रशासन अत्यावश्यक पदांची भरती करता आली नव्हती. परंतु आता हा प्रश्न मार्गी लागत असून प्रत्यक्षात पदभरती केव्हा होणार हे मात्र पहावं लागणार आहे. (Thane Mahanagarpalika Bharti 2023)

Thane Mahanagarpalika Bharti 2023

ठाणे महापालिकेतील रिक्त जागा भरल्या जात नसल्याने याचा मोठा परिणाम पालिकेच्या कारभारावर होऊ लागला होता. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाणे महापालिकेतील अनेक प्रश्न मार्गी लागताना दिसत आहेत. नुकतीच १७३८ पदे सरळसेवा पद्दतीने भरती करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून यासाठी लवकरच जाहिरात काढण्यात येणार आहे. (Thane Mahanagarpalika Bharti 2023)

१ ऑक्टोबर १९८२ रोजी ठाणे महापालिकेची स्थापना झाली. जवळपास पाच वर्षे प्रशासकीय कारभार पाहिल्यानंतर या महापालिकेवर लोकनियुक्त प्रतिनिधी सत्तेवर आले. त्यानंतरच्या काही वर्षात म्हणजे मुख्यतः ९० च्या दशकात पालिकेच्या सेवेत मोठी भरती करण्यात आली होती. त्यावेळी जे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले, ते आता निवृत्तीच्या वाटेवर आहेत. जानेवारी आणि जून या महिन्यात निवृत्त होणाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात असते. गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी निवृत्त होत आहेत. (Thane Mahanagarpalika Bharti 2023)

ठाणे पालिकेत सध्या वर्ग १ ची ११९, वर्ग २ ची ११२, वर्ग ३ ची १६०१ आणि वर्ग ४ ची २ हजार २३१ अशी एकूण ४ हजार ६३ पदे रिक्त आहेत. सप्टेंबर २०१९ मध्ये शासनाने ६८२ नवी पदे निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे तर ११ एप्रिल २०२२ रोजी अत्यावश्यक सेवेतील ८८० पदे निर्माण करण्यास मान्यता मिळाली आहे.

Recent Articles