श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान पदभरतीचा निकाल जाहीर; सर्व PDF उपलब्ध | Tuljabhavani Temple Trust Bharti Result
मुंबई | तुळजाभवानी मंदिरातील विविध रिक्त जागांच्या भरतीसाठी (Tuljabhavani Temple Trust Bharti Result) घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. सदर निकाल परीक्षा घेणाऱ्या आयबीपीएस कंपनी द्वारे जाहीर करण्यात आला आहे.
तुळजा भवानी मंदिरातील रिक्त जागांच्या भरतीसाठी तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या लेखी परीक्षेत राज्यातील विविध १९ केंद्रावर १० हजार ५०० उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा दिली होती. लवकरच मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया जाहीर होईल.
नियुक्तीसाठी लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या टॉपच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. एका जागेसाठी १० उमेदवारांना बोलाविण्यात येणार आहे. कागदपत्रांची छाननी, चारित्र्य प्रमाणपत्र, वैद्यकीय चाचणीनंतर पात्र उमेदवारांना लगेच नियुक्ती देण्यात येणार आहे.
सर्व निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा
कागदपत्र तपासणीसाठी पात्र उमेदवारांचे कागदपत्र
तपासणीसाठी विविध तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. याशिवाय लिपिक व भांडारपाल पदासाठी टंकलेखन परीक्षा तसेच सुरक्षा निरीक्षक व सहाय्यक सुरक्षा निरीक्षक पदासाठी छाती, उंची आदी. अटींची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे.