उल्हासनगर | उल्हासनगर महानगरपालिका (Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment) मध्ये सेवानिवृत्त विकी कर अधिकारी / आयकर अधिकारी किंवा संनदी लेखापाल पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – सेवानिवृत्त विकी कर अधिकारी / आयकर अधिकारी किंवा संनदी लेखापाल
पदसंख्या – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) (Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment)
नोकरी ठिकाण – उल्हासनगर, ठाणे
अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, उल्हासनगर महानगरपालिका (Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – www.umc.gov.in
PDF जाहिरात – https://shorturl.at/ewBMO
वेतनश्रेणी –
सेवानिवृत्त विकी कर अधिकारी / आयकर अधिकारी किंवा संनदी लेखापाल – रु.३०,०००/–
अटी व शर्ती :–
करार पध्दतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे / सामावून घेण्याचे वा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार / हक्क नसेल. नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी अशा अधिकाऱ्यांच्या करार पध्दतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील.
करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती, सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल, अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेला नसावी.
करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील. (Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment)
करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे / माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील.
करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांच्यावर सोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील. त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील.