मुंबई | राज्याच्या वनविभागातील भरतीची अनेक उमेदवार आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान प्रकाशित झालेली जाहिरात बोगस असल्याचीही काही काळ चर्चा होती. परंतु वनविभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरातीची पीडीएफ फाईल प्रकाशित झाल्याने सर्वांनाच आनंद झाला आहे. (Van Vibhag Forest Guard Recruitment 2023)
वनविभागातील “वनरक्षक (गट क)” पदांची 2138 रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. (Van Vibhag Forest Guard Recruitment 2023)
सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरील लिंकवर विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येईल. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. ऑनलाईन अर्ज 10 जुन 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे हे उमेदवारांनी ध्यानात घ्यावे.
शैक्षणिक पात्रता
1. उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
2. अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील.
3. माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
4. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
(टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.)
5. अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
6. मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
PDF जाहिरात – https://Forest Guard/pdf
ऑनलाईन अर्ज करा (लिंक 10 जून 2023 पासून सुरु होईल) – https://mahaforest/recruitment/2023