Van Vibhag Recruitment | वन विभागात नोकरीची संधी; अर्ज करण्याची शेवटची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना वन विभाग नागपूर (Van Vibhag Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर “ वनभवन”, दुसरा मजला, “अ” विंग, रामगिरी रोड सिव्हील लाईन, नागपूर – ४४०००१ असा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 मे 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –
सेवानिवृत्त अधिकारी –
१. गट-अ संवर्गातील विभागीय वन अधिकारी या पदाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
२. आस्थापना विषयक व वनविभागातील प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव असणे यांना प्राधान्य देण्यात येईल (Van Vibhag Recruitment)
३. भरती प्रक्रीयेसंबंधाचे ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे.
४. संगणक वापराचा अनुभव असणे.
५. नागपूर मुख्यालयी असणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईटmahaforest.gov.in

Recent Articles