Work From Home : घरबसल्या लाखो रुपये कमवायचे आहेत? मग ‘या’ टॉप फिल्ड्स मध्ये मिळेल पर्मनंट वर्क फ्रॉम होमची संधी

कोरोनो काळापासून वर्क फ्रॉम होम (Work From Home) करण्याची पध्दत सुरू झाली. कालांतराने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि जनजीवन सुरळीत झाले. तरीदेखील काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची संधी देऊ केली. तर काही कंपन्यांनी हायब्रीड मोडवर काम सुरू केले. परंतु वर्क फ्रॉम होमची आवड निर्माण झालेल्यांना तसेच नव्याने नोकरीच्या शोधात असणाऱ्यांपैकी अनेकांना घरबसल्या काम करण्याची इच्छा कायम आहे. त्यामुळे घरबसल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची संख्या वाढतानाच दिसत आहे. अशाच लोकांसाठी आज आम्ही घरबसल्या काम करण्यासाठी काही संधी घेऊन आलो आहोत. चला तर जाणून घेऊया…

  • UX डिझायनर : जर तुम्हाला घरी बसून भरपूर पैसे कमवायचे असतील तर तुम्ही UX डिझायनर बनण्याचा विचार केला पाहिजे. सेवा किंवा उत्पादन अधिक सोपे आणि उपयुक्त बनवणे हे UX डिझायनरचे काम आहे. भारतात UX डिझायनर म्हणून, एखाद्याला 3-4 लाख रुपये प्रारंभिक पगार मिळू शकतो आणि अनुभवाने तो वाढत जातो. (Work From Home)
  • आयटी सिक्युरिटी एक्सपर्ट : सध्या जगभर आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांचा बोलबाला आहे. आयटी क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत असून नोकरीच्या संधीही भरमसाठ आहेत. एकीकडे आयटी क्षेत्र विस्तारत असताना या क्षेत्रात काही अपप्रवृत्तींमुळे या क्षेत्रात सुरक्षितेचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झालेला दिसतो. त्यामुळे यासाठी आयटी सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणून लोकांची गरज आहे. कॉम्प्युटर सिस्टीममध्ये मालवेअर किंवा धोके शोधणे तसेच हार्डवेअरपासून सॉफ्टवेअरपर्यंत आणि इतर सुरक्षेच्या मुद्द्यांवर सिस्टममध्ये काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आयटी सिक्युरिटी एक्सपर्ट लोकांची मोठी गरज असून अनेक कंपन्या घरबसल्या अशा लोकांना नोकरीची संधी देतात. (Work From Home)
  • सायकोलॉजी : दिवसेंदिवस स्पर्धात्मक जगामुळे मानसिक ताणतणावात वाढ होत आहे. मानवाचे जीवनमान उंचावले असले तरी त्यातुलनेत मानसिक आरोग्य अनेकांनी गमावले आहे. अशा विविध कारणांमुळे मानसशास्त्राच्या क्षेत्रात सतत संधी वाढत आहेत आणि घरातून काम करणे हा या क्षेत्रात चांगला पर्यायही तयार होत आहे. सायकॉलॉजिस्टना त्याच्या जागी बसून समोरच्याना कॉल करावा लागतो किंवा व्हिडिओ कॉलद्वारे समुपदेशन करावे लागते. या क्षेत्रात मानवी वर्तनाचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या कौशल्यानुसार या क्षेत्रात पैसे आकारू शकता आणि चांगली कमाई करू शकता. (Work From Home)
  • यासोबतच डिजिटल मार्केटिंग, कंटेंट रायटिंग, प्रॉडक्ट रिव्ह्यू, ब्लॉगिंग, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर अशी इतरही अनेक फील्ड्स आहेत, जिथे घरून काम (Work From Home) करण्याची सुविधा कायम उपलब्ध असून आर्थिक कमाईची देखील चांगली संधी आहे.

Recent Articles