पंकज त्रिपाठी यांचा जन्म 28 सप्टेंबर 1976 रोजी भारताच्या बिहार राज्यातील गोपालगंज जिल्ह्यातील बेलसांड गावात झाला असून ते एक हिंदी भारतीय अभिनेते आहेत. 

पंकज त्रिपाठी यांनी 2004 मध्ये रन आणि ओंकारामध्ये छोट्या भूमिकेसह पदार्पण केले आणि तेव्हापासून त्यांनी 520 हून अधिक चित्रपट आणि 65 दूरदर्शन कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.

पंकज त्रिपाठी यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक फिल्मफेर पुरस्कार, एक स्क्रीन पुरस्कार आणि आयफा पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

पंकज त्रिपाठी यांच्या 'मैं अटल हूं' या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आला. यामध्ये त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे.

कॉलेजमध्ये असताना पंकज त्रिपाठी यांना राजकारणात खूप रस होता. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीची ही गोष्ट असून ते एका विद्यार्थी संघटनेचे नेतेही होते. 

विद्यार्थी संघटनेचा नेता असल्याने त्यांना एकदा आठवडाभर तुरुंगात जावे लागले. त्यामुळे राजकारणाचा प्रवास काट्यांनी भरलेला असल्याची त्यांना जाणीव झाली.

राजकारणाप्रमाणे इथेही अभिनय करावा लागतो. त्यामुळेच त्यांनी राजकारण सोडून अभिनयाची निवड केली.  पण इथे कमी बोलून वागावे लागते असे ते सांगतात.

पंकज त्रिपाठी दिवंगत भारतीय अभिनेते इरफान खान  यांना आपले गुरू मानत असल्याचे त्यांच्या एका इन्स्टा पोस्टवरून दिसून येते. 

पंकज यांचे 15 जानेवारी 2004 रोजी मृदुला यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतर ते मुंबईला आले. त्यांना आशी नावाची मुलगी असून तिचा जन्म 2006 मध्ये झाला आहे.