Wipro Technologies Recruitment | विप्रो मध्ये IT प्रोफेशनल्स साठी नोकऱ्यांची संधी

मुंबई | विप्रो टेक्नॉलॉजीज ही अझीम प्रेमजी यांच्या विप्रो कर्पोरेशन या उद्योगसमुहातील सर्वात मोठी कंपनी आहे. जगभरात लाखो कर्मचारी आणि विविध देशांमध्ये शेकडो विकसन केंद्रे असलेली विप्रो टेक्नोलॉजीज ही भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाची आयटी कंपनी आहे. सध्या कंपनीत विविध पदांसाठी पदभरती (Wipro Technologies Recruitment) सुरू आहे.

Wipro उद्योग समूहाचा भाग असलेल्या Wipro Technologies मध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीची  (Wipro Technologies Recruitment) संधी उपलब्ध आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तुम्हाला कामाचा अनुभव असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध आहे. ‘टेकगिग’ने नुकतेच याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

Wipro Technologies Recruitment

Wipro कंपनीनं आपल्या ऑफिसेसमध्ये सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनीअर पदासाठी कर्मचारी भरती सुरू केली आहे. ही पदे सध्या नोएडा ऑफिससाठी भरली जात आहेत. तसेच ज्या उमेदवारांना याव्यतिरिक्त ठिकाणांसाठी Wipro Technologies मधील नोकरीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी ख़ाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्यासाठी योग्य ती पोस्ट शोधून त्याप्रमाणे अर्ज़ करावा.

सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनीअर पदाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या ((Wipro Technologies Recruitment))

1. माहितीच्या गरजा, सिस्टिम फ्लो, डेटा युसेज आणि कार्य प्रक्रियांचा अभ्यास करून सॉफ्टवेअर सोल्युशन्स डेव्हलप करणं.
2. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाइफ सायकलनंतर येणाऱ्या अडचणी तपासणं.
3. सिस्टिम इश्युज आणि प्रॉब्लेम स्टेटमेंटच्या मूळ कारणांचं विश्लेषण करून ते सोपं करणं.
4. सिस्टिम कार्यप्रदर्शन आणि इम्पॅक्ट उपलब्धता सुधारण्यासाठी नवीन आयडिया शोधणं.
5. क्लायंटच्या गरजांचं विश्लेषण करणं आणि त्या गरजांना व्यवहार्य डिझाईनमध्ये रूपांतरित करणं.
6. फंक्शनल टीम्स किंवा सिस्टिम अॅनॅलिस्ट्सच्या सहकार्यानं सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्समधील तपशीलांची तपासणी करणं.
7. सॉफ्टवेअर क्षमतांबद्दल माहिती मिळविण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजरशी चर्चा करणं.
8. अॅनॅलिसिस, प्रॉब्लेम डेफिनेशन, रिक्वायरमेंट्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि प्रस्तावित सॉफ्टवेअरचं मूल्यांकन करून त्याची ऑपरेशनल व्यवहार्यता निश्चित करणं.
9. टेस्ट केसेस/सिनॅरिओज/युसेज केसेस सेट अप आणि डिझाईन करून, त्यांची अंमलबजावणी करून सॉफ्टवेअर प्रमाणीकरणासाठी प्रक्रिया विकसित आणि स्वयंचलित करणं.
10. त्रुटी दूर करण्यासाठी, नवीन हार्डवेअरशी जुळवून घेण्यासाठी, त्याचं कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी किंवा इंटरफेस अपग्रेड करण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये बदल करणं.
11. नवीन सिस्टिमच्या इन्स्टॉलमेंटची किंवा सध्याच्या प्रणालीतील बदलांची शिफारस करण्यासाठी आणि प्लॅन करण्यासाठी माहितीचं विश्लेषण करणे.

Wipro Technologies Career Links

1. Wipro Career in India
2. Wipro Global Career
3. Wipro Job opportunity

Recent Articles