मुंबई | सध्याचा जमाना हा डिजिटलायझेशनचा जमाना आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया आणि ऑनलाइन शॉपिंगवर लोकांचा अधिक भर आहे. यामुळे ई-कॉमर्ससह अनेक कंपन्यांच्या वेबसाइटला कंटेंट रायटरची (Content Writer) जास्त गरज आहे.
अनेक कंपन्या कंटेंट रायटर्सना कायमस्वरूपी कामावर घेतात तर छोट्या कंपन्या फ्रीलांसिंग स्वरूपात कंटेट तयार करून घेतात. हे काम तुम्हाल कुठे शोधता येईल आणि कोणत्या कंपन्या यासाठी विश्वासू आहेत याची माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.
फ्रीलांसन्सरची आवश्यकता असणाऱ्या कंपन्यांसाठी तुम्ही कंटेंट रायटिंगचे (Content Writing) काम करून लाखो रूपयांची कमाई घरबसल्या (Work From Home) करू शकता. देशातील अनेक कंपन्यांना हिंदी-इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील कंटेंट रायटरची कायमच आवश्यकता असते.
प्रत्येक कंपनीला विविध प्रकारच्या कंटेंटची आवश्यकता असते. कंपनीच्या वापरकर्त्यास उपयुक्त आणि वाचण्यासाठी आकर्षित करणाऱ्या कंटेटची निर्मीती (Content Writing) करणे हे कंटेंट रायटरचे काम असते. यासाठी कंपन्या फ्रीलांसर लेखकांना प्रति शब्द याप्रमाणे चांगले पैसे देतात. (Work From Home)
कंपन्या त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कंटेट रायटर्सना (फ्रीलान्स) 40 पैसे प्रति शब्द ते 1 रुपये प्रति शब्द देतात. तांत्रिक किंवा गैर-तांत्रिक लेखन यावर हे दर अवलंबून आहेत. तसेच इंग्रजी, हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेत लिहिण्याचे दर वेगवेगळे असतात.
जर तुम्ही एखाद्या कंपनीसाठी फ्रीलांसर म्हणून कंटेंट रायटिंग करत असाल आणि त्यासाठी तुम्हाला प्रति शब्द 1 रुपये दिले जात असतील, तर एका दिवसात 3,000 शब्द लिहिल्यास 3,000 रुपये सहज कमवता येतात. म्हणजेच दरमहा सुमारे 90 हजारांची कमाई घरबसल्या करता येते.
फ्रीलांसिंग कंटेंट रायटिंगचे (freelance Content Writing) काम मिळवण्यासाठी आधी तुम्हाला कंटेट/लेखनाची आवड असणे फार गरजेचे आहे. फ्रीलांसिंग कंटेट रायटिंगसाठी Online सर्च केल्यास अनेक कंपन्या दिसतील. यामध्ये Fiverr आणि Upwork अधिक विश्वासू आणि लोकप्रिय आहेत. याशिवाय तुम्ही स्वतंत्र लेखनासाठी इतर कंपन्यांशीही संपर्क साधू शकता.