ZP Aurangabad Recruitment | जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद औरंगाबाद, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग (ZP Aurangabad Recruitment) येथे नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत कनिष्ठ/शाखा अभियंता पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

अर्ज करण्याचा पत्ता कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग जि.प. औरंगाबाद असा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 मे 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ/शाखा अभियंता –
१. पदवीधर अभियंता (स्थापत्य)/(यांत्रिकी) नागरी कामाच्या अंमलबजावणीच्या क्षेत्रात किमान ३ वर्षाचा अनुभव. संगणक हाताळण्या संबंधित ज्ञान आवश्यक, निविदा प्रक्रिया आणि नागरी प्रकल्पाचे निरिक्षण व मुल्यमापन बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. (ZP Aurangabad Recruitment)
२. सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असणे गरजेचे आहे.
३. इच्छूक अभियंताची शैक्षणिक अर्हता B.Tech/BE Civil/ Mechanical M.Tech/M.E. असावी

अधिकृत वेबसाईटaurangabadzp.gov.in

Recent Articles