गोंदिया | गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत नोकरीच्या शोधात असणाऱ्या (ZP Gondia Bharti 2023) उमेदवारांसाठी नोकरीची ही चांगली संधी आहे. जिल्हा परिषदे अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर पदांची भरती केली जाणार आहे. या पदभरतीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN ) योजना, शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत जिल्हा स्तरावरील व पंचायत समिती स्तरावरील रिक्त असणारी “डाटा एन्ट्री ऑपरेटर्सची” पदे तात्पुरत्या स्वरुपात पुढील 11 महिन्याच्या कालावाधीकरीता कंत्राटी पध्दतीने एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहेत. रिक्त पदांची स्थिती खाली दिली आहे. (ZP Gondia Bharti 2023)
उमेदवाराने आपला अर्ज – सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया यांचे कार्यालयातील “प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष” मध्ये समक्ष किंवा अंतिम दिनांकाच्या पुर्वी पोस्टाने सुट्टीचे दिवस वगळून सादर करावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जून 2023 असेल. यांनतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
या पदांसाठी शैक्षणिक पात्रता
अ) किमान इयत्ता 12 वी पास
ब) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
क) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
ड) MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, वय प्रमाणपत्र, प्रवर्ग निहाय जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, संदर्भातील कागदपत्रांचा झेरॉक्स प्रती स्व स्वाक्षांकित (self attested) करुन जोडाव्यात. निवड झालेल्या उमेदवारांना प्रवर्ग निहाय 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र ( Caste Validity) सादर करणे बंधनकारक राहिल. तसेच वैध असलेले नॉन क्रिमेलियर प्रमाणपत्राची छायांकित प्रत सादर करणे बंधनकारक राहिल.
PDF जाहिरात व अर्ज नमुना – https://shorturl.at/oswIK
अधिकृत वेबसाईट – zpgondia.gov.in