मुंबई | राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागांची भरती (ZP Mega Recruitment) केली जाणार आहे. जिल्हा परिषदांनी भरती प्रक्रिया आयोजित करताना सुलभ संदर्भासाठी खालील मुद्यांचा विचार करावा. यासाठी नवीन झेडपीचा जीआर जारी करण्यात आला आहे.
नवीन जिल्हा परिषद जीआर नुसार, वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता शासन निर्णयांद्वारे निर्धारित केली आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे) दोन वर्षांची (खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे) सूट ग्राह्य धरण्यात यावी. (ZP Mega Recruitment)
उपरोक्त संदर्भाधिन क्र. १ चे शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गातील (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेची रिक्त पदे भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेत आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने संदर्भ क्र. २ व ३ नुसार सरळसेवेची रिक्त पदे भरणेबाबत वेळापत्रक निश्चित करणेत आलेले होते.
सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दि. २१ नोव्हेंबर २०२२ अन्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत राबविणेच्या सूचना निर्गमित करणेत आल्या आहेत.
त्यामुळे सरळसेवेची रिक्त पदे वरील कंपनीमार्फत भरणेसाठी जिल्हा परिषदांमध्ये एकसूत्रता असणे आवश्यक आहे.
Download Full Zilla Parishad New GR
ZP Mega Recruitment | जि.प. अंतर्गत १८,९३९ पदभरती | हेल्पलाइन क्रमांकांवर मिळणार माहिती
मुंबई | राज्यात जिल्हा परिषदांमधून होणाऱ्या पदभरतीबाबत उमेदवारांना मिळणारी उडवाउडवीची उत्तरे लक्षात घेता त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आता प्रत्येक जिल्हा परिषदांमधून पदभरती होईपर्यंत हेल्पलाइन क्रमांक सुरू केले जाणार आहेत. या क्रमांकावर उमेदवारांना भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळणार आहे.
दरम्यान, शासनाने सरळ सेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता दिली आहे. तसेच जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची बिंदुनामावली अंतिम केली आहे. त्यानंतर आता आयबीपीएस कंपनीद्वारे ऑनलाइन परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार या कंपनीकडून अॅप्लिकेशन पोर्टल विकसित करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
राज्यात एकाच वेळी परीक्षा घेण्यासाठी सदर कंपनीला औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक प्रणाली भाडेतत्त्वावर देण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार सदर महाविद्यालयातील संगणक प्रणाली परीक्षेसाठी भाडेतत्त्वावर देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
ZP Mega Recruitment | १५ ऑगस्टपूर्वी जिल्हा परिषदांमध्ये ७५,००० जागांची भरती; जाणून घ्या डिटेल्स
मुंबई | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकार (ZP Mega Recruitment) सरळसेवा कोट्यातील ७५ हजार पदांची भरती करणार आहे. १५ ऑगस्टपूर्वी ही पदे भरली जाणार असून सर्व जिल्हा परिषदांमधील ‘गट-क’ संवर्गातील १८ हजार ९३९ पदे एकावेळी भरली जाणार आहेत. त्यासाठी शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक प्रणाली भाड्याने घेतली जाणार आहे. आयबीपीएस व टीसीएस या खासगी कंपन्यांद्वारे ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे.
१० एप्रिल रोजी राज्यातील बेरोजगारीवर प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर १२ एप्रिलला ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र आदेश काढले आहेत. १६ मार्च २०२३च्या शासन निर्णयानुसार, ३१ डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदांमध्ये सरळसेवेच्या भरतीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी शिथिल केली आहे. (ZP Mega Recruitment)
तसेच मार्च २०१९च्या जाहिरातीप्रमाणे यापूर्वी अर्ज केलेले सर्व उमेदवार देखील परीक्षा देऊ शकतात, असेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान, ‘आयबीपीएस’कडून उमेदवारांसाठी ‘ॲप्लिकेशन पोर्टल’ विकसित केले जात आहे. त्यासंबंधाने पुढील काही दिवसांत सर्व जिल्हा (ZP Mega Recruitment) परिषदांना त्यांच्या पद भरतीसंदर्भातील जाहिरातीचा नमुना, आरक्षणनिहाय रिक्त पदे, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, याची माहिती कंपनीला द्यावी लागणार आहे.