ZP Recruitment | जिल्हा परिषद अंतर्गत मुलाखतीद्वारे रिक्त जागांची भरती; १,२५,००० पगार

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी नांदेड अंतर्गत नोकरीची (ZP Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन/सल्लागार औषध, बालरोगतज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. 30 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 5 जून 2023 आहे. मुलाखतीचा पत्ता जिल्हा प्रशिक्षण केंद्र, मल्टीपर्पज हायस्कुलच्या मागे, वजिराबाद, नांदेड असा आहे. (ZP Recruitment)

शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी – MBBS
फिजिशियन/सल्लागार औषध – MD Medicine/ DNB
बालरोगतज्ञ – MD Paed / DCH / DNB
हृदयरोगतज्ज्ञ – DM Cardiology

वेतनश्रेणी –
वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
फिजिशियन/सल्लागार औषध – 75,000/-
बालरोगतज्ञ – 75,000/-
हृदयरोगतज्ज्ञ – 1,25,000/-

image 68

अधिकृत वेबसाईटzpnanded.in
PDF जाहिरातshorturl.at/klOQU

Recent Articles