मोठी बातमी! जलसंपदा विभागात विविध पदांच्या ३६८ जागा रिक्त, नवीन अपडेट पहा | Jalsampada Vibhag Job 2024
महाराष्ट्र जल संपदा विभागात विविध श्रेणीतील एकूण ३६८ पदे रिक्त आहे. या रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकर राबविण्यात यावी हि मागणी आहे. प्रस्तुत अर्जान्वये आपणाकडून अपेक्षिलेल्या माहितीच्या अनुषंगाने कळविण्यात येते की मा. कार्यासनाशी संबंधित सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य), सहायक अभियंता श्रेणी २ (विवया), सहायक अभियंता श्रेणी-२ (यांत्रिकी) रिक्त पदांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. जलसंपदा विभागातील सहायक अभियंता (स्थापत्य) श्रेणी-२, गट व या संवर्गातील ३३४ पदे रिक्त आहेत, तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेना परिक्षा-२०२२ करिता १०२ पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आले होते.
त्यानुसार सदर पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १०१ उमेदवारांची शिफारस प्राप्त झालेली बसून सदर उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही सद्यस्थितीत सुरु आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षा २०२४ मधील सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य), सहायक अभियंता श्रेणी-२ (विवय, सहायक अभियंता श्रेणी-२ (यांत्रिकी) या संवर्गातील मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आलेले नाही.