Career

खुशखबर! स्टेट बँक ऑफ इंडियात 15,000 रिक्त जागांची भरती; ही संधी चुकवू नका | State Bank of India Recruitment 2024

सरकारी बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठ्या बँकेत म्हणजेच एसबीआयमध्ये तब्बल 12 ते 15 हजार कर्मचाऱ्यांसाठी भरती (State Bank of India Recruitment 2024) प्रकिया राबवली जाणार आहे. याबाबतची माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी गुरुवारी दिली. आयटीसोबतच या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या भूमिकांबद्दल प्रशिक्षण देखील दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

स्टेट बँकेत 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस 2 लाख 32 हजार 296 कर्मचारी होते, जे 2022-23 या आर्थिक वर्षातील 2 लाख 35 हजार 858 कर्मचाऱ्यांपेक्षा कमी आहेत. त्यामुळे आता एसबीआयने भरती प्रकिया सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत सुमारे 12,000 ते 15,000 कर्मचारी भरती केले जातील, जे सामान्य कर्मचारी असतील, अशी माहिती दिनेश खारा यांनी दिली.

State Bank of India Recruitment 2024

बँकेच्या नवीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी आम्ही तंत्रज्ञान कौशल्याचा विचार करत आहे, असंही खारा यांनी सांगितलं. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत एसबीआय बँकेचा निव्वळ नफा 24 टक्क्यांनी वाढून 20,698 कोटी रुपये झाला आहे. त्यानंतर बँकेने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक इक्विटी शेअरवर 13.70 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. त्यामुळे आता एसबीआय सध्या मजबूत स्थितीत असल्याचं पहायला मिळत आहे.

दरम्यान, येत्या काळात तुम्हाला भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर, उमेदवाराने करिअर लिंकवर क्लिक करावे आणि घोषणेवर जावे आणि भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करावं. त्यानंतर नवीन पृष्ठावरील नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करून प्रथम नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर लॉगिनद्वारे अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

Back to top button