खुषखबर: महिला व बाल विकास विभागात तब्बल ८,६६९ पदांची भरती, संधी चुकवू नका | Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2026

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2026: राज्यातील महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर मोठ्या प्रमाणावर नियमित पदभरतीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. “महिला व बाल विकास विभाग भरती २०२६” अंतर्गत एकूण ८ हजार ६६९ पदांना मंजुरी देण्यात आली असून, या निर्णयामुळे विभागाच्या कामकाजाला मोठी गती मिळणार आहे. ही माहिती महिला व बालविकास मंत्री Aditi Tatkare यांनी दिली.

राज्य सरकारकडून विभागातील विद्यमान पदांचा सखोल आढावा घेण्यात आला. या आढाव्यात काही पदे कालबाह्य किंवा अनावश्यक ठरल्याने ती निरसित करण्यात आली. त्याचवेळी विभागाच्या गरजेनुसार १६५ नवीन पदांची निर्मिती करण्यात आली. या सर्व प्रक्रियेनंतर एकूण ८ हजार ६६९ नियमित पदांची अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रशासनिक कार्यक्षमता वाढेल आणि विभागाची सेवा अधिक सक्षमपणे राबवता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याशिवाय, विभागाच्या विविध योजना आणि प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यासाठी बाह्ययंत्रणेमार्फत २ हजार ८४३ पदे भरण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे विविध स्तरांवरील कामकाज जलद गतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत देखील मोठ्या प्रमाणावर मानधनाधारित पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका आणि तितक्याच म्हणजे १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी मदतनीस पदांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण २ लाख २१ हजार ३२८ मानधनाधारित पदे मंजूर करण्यात आली आहेत. या निर्णयामुळे बालकांच्या पोषण, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित सेवा अधिक प्रभावीपणे राबवता येतील.

२३ वर्षांनंतर घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्यासाठी तो निर्णायक ठरणार आहे. विभागातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

भरतीमध्ये समाविष्ट काही प्रमुख पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे: Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2026

पदाचे नाववर्ग
अधिक्षक / निरीक्षक
प्रमाणित शाळा व संस्था अधिकारी
रचना व कार्यपद्धती अधिकारी
अधिव्याख्याता
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
सांख्यिकी अधिकारी (गट-ब, राजपत्रित)गट-ब
बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)गट-ब

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा