देशातील आघाडीची आयटी आणि बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस (BPO) क्षेत्रातील कंपनी (Tech Mahindra Recruitment 2026) ने पुणे येथील कार्यालयासाठी Associate (Customer Service – Voice & Chat) पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. ग्राहक सेवा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी मानली जात आहे. ही भरती पुणे जिल्ह्यातील येरवडा येथील कार्यालयासाठी असून निवड झालेल्या उमेदवारांना Work From Office (WFO) पद्धतीने काम करावे लागणार आहे.
या भरतीसाठी फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवार दोघेही अर्ज करू शकतात. मात्र उमेदवारांकडे उत्कृष्ट इंग्रजी संवाद कौशल्य (Excellent Communication Skills) असणे आवश्यक आहे. ग्राहकांशी थेट संवाद साधण्याचे काम असल्यामुळे बोलण्याची आणि समजून घेण्याची क्षमता या पदासाठी महत्त्वाची मानली जाणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या पदासाठी वार्षिक वेतन ₹2.9 लाखांपासून ₹6 लाखांपर्यंत असू शकते. सुरुवातीचे इन-हँड वेतन सुमारे ₹20,000 प्रतिमहिना असून अनुभव, मागील वेतन (Last CTC) आणि पात्रतेनुसार ते सुमारे ₹39,000 प्रतिमहिन्यापर्यंत जाऊ शकते. अनुभवी उमेदवारांना त्यांच्या मागील CTC वर सुमारे 30 टक्क्यांपर्यंत वेतनवाढ दिली जाऊ शकते.
या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना UK, US आणि Australia या आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी विविध शिफ्टमध्ये काम करावे लागेल. त्यामुळे रोटेशनल शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. कंपनीकडून तातडीने (Immediate) जॉइनिंग दिली जाणार असून भरती प्रक्रिया व्हर्च्युअल मुलाखतीद्वारे पार पडणार आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक आणि ओळखपत्रासह संबंधित कागदपत्रे तयार ठेवावीत. इच्छुक उमेदवारांनी HR प्रतिनिधी प्राजक्ता यांच्याशी संपर्क साधू शकतात किंवा अधिकृत ई-मेलद्वारे अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
Tech Mahindra ही महिंद्रा समूहाची जागतिक स्तरावरील अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनी असून जगभरातील 90 हून अधिक देशांमध्ये 1.49 लाखांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनी माहिती तंत्रज्ञान, डिजिटल सोल्यूशन्स, क्लाऊड, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), नेटवर्क सेवा, ग्राहक अनुभव आणि बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस अशा विविध क्षेत्रांमध्ये सेवा पुरवते. जगभरातील 1,100 हून अधिक ग्राहकांना कंपनी सेवा देत असून तंत्रज्ञान क्षेत्रातील विश्वासार्ह कंपन्यांपैकी एक म्हणून Tech Mahindra ची ओळख आहे.
भरतीचा थोडक्यात तपशील : Tech Mahindra Recruitment 2026
| घटक | माहिती |
|---|---|
| कंपनी | Tech Mahindra |
| पद | Associate – Customer Service (Voice & Chat) |
| नोकरीचे ठिकाण | येरवडा, पुणे |
| कामाचे स्वरूप | Work From Office (WFO) |
| अनुभव | फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवार |
| वार्षिक वेतन | ₹2.9 लाख ते ₹6 लाख |
| मासिक इन-हँड वेतन | ₹20,000 ते ₹39,000 (अनुभवानुसार) |
| शिफ्ट | UK / US / Australia |
| मुलाखत | Virtual |
| जॉइनिंग | Immediate |
| आवश्यक कौशल्य | Excellent Communication Skills |
| HR संपर्क | Prajakta – 8975328696 |
| ई-मेल | prajaktayash.pawar@techmahindra.com |
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंकला भेट द्या : https://www.linkedin.com/jobs/view/4422255796
