संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये मोठी भरती, संधी चुकवू नका | SGBAU Amravati Bharti 2026

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

SGBAU Amravati Bharti 2026: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विविध महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक तसेच अशैक्षणिक पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. बुलडाणा, वाशिम, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये एकूण 70 पेक्षा अधिक रिक्त जागा भरण्यात येणार असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच काही पदांसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

फार्मसी महाविद्यालयांमध्ये 59 पदांसाठी भरती

राजर्षी शाहू फार्मसी कॉलेज, बुलडाणा आणि संत गजानन महाराज फार्मसी कॉलेज, बुलडाणा या महाविद्यालयांमध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक अशा एकूण 59 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत करण्यात येत आहे.

या पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2026 आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असून, सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

पदनिहाय तपशील :

पदाचे नावपदसंख्या
प्राचार्य01
प्राध्यापक10
सहयोगी प्राध्यापक19
सहाय्यक प्राध्यापक29
एकूण59

अर्ज खालील पत्त्यावर पाठवायचा आहे –
राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी, माळविहीर, बोथा रोड, बुलडाणा, पोस्ट बुलडाणा, जि. बुलडाणा (महाराष्ट्र) – 443001.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/9Ujxs
अधिकृत वेबसाईटhttps://www.sgbau.ac.in/

वाशिम येथील महाविद्यालयात प्राचार्य पदासाठी थेट मुलाखत

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न कलंदर्य कला, वाणिज्य आणि विद्या महाविद्यालय, वाशिम येथे प्राचार्य पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नसून, थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 जानेवारी 2026 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखत कलंदर्य कला, वाणिज्य आणि विद्या महाविद्यालय, मौजे मुर्तिजापूर, ता. मंगरूळपीर, जि. वाशिम येथे आयोजित करण्यात आली आहे.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/Aht7c
अधिकृत वेबसाईटhttps://www.sgbau.ac.in/

अकोला येथील कला महाविद्यालयात प्राचार्य पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत

छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगाव पूर्णा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथे प्राचार्य पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जानेवारी 2026 आहे. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/9Ujxs
अधिकृत वेबसाईटhttps://www.sgbau.ac.in/

यवतमाळ येथील महिला महाविद्यालयात अशैक्षणिक पदांसाठी भरती

शानुबाई नाईक महिला महाविद्यालय, ढाणकी (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथे कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, शिपर आणि ग्रंथालय परिचर या पदांसाठी एकूण 12 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी 2026 आहे.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/9Ujxs
अधिकृत वेबसाईटhttps://www.sgbau.ac.in/

पदनिहाय तपशील :

पदाचे नावपदसंख्या
कनिष्ठ लिपिक01
प्रयोगशाळा सहाय्यक01
प्रयोगशाळा परिचर04
शिपर05
ग्रंथालय परिचर01
एकूण12

सर्व उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असून, अपूर्ण अर्ज सरळ नाकारले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरील संबंधित PDF जाहिरात वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा