Beed Police Patil Bharti 2026: बीड जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालये व उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयांच्या अंतर्गत “पोलीस पाटील” पदांच्या एकूण 1178 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया बीड जिल्हा प्रशासन यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून राबविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जानेवारी 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया 19 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे.
या भरतीमध्ये “पोलीस पाटील” हे पद असून एकूण 1178 जागा उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रता म्हणून किमान दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 30 जानेवारी 2026 रोजी किमान 25 वर्षे व कमाल 45 वर्षे असणे बंधनकारक आहे. या पदासाठी कोणतीही वयोमर्यादा शिथिलता लागू नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. नोकरीचे ठिकाण संबंधित उपविभागाच्या कार्यक्षेत्रात राहणार आहे.
उपविभागनिहाय पदसंख्या पुढीलप्रमाणे आहे : Beed Police Patil Bharti 2026
| उपविभाग | पदसंख्या |
|---|---|
| माजलगाव | 197 |
| बीड | 434 |
| परळी | 99 |
| पाटोदा | 246 |
| अंबाजोगाई | 202 |
| एकूण | 1178 |
अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये असून आरक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) उमेदवारांसाठी 800 रुपये इतके आहे. अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत.
भरतीच्या अटी व शर्तींबाबत प्रशासनाने सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. अर्जदार हा स्थानिक व कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक असून त्याबाबत ग्रामपंचायत किंवा तहसीलदार यांचे रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. मुलाखतीच्या वेळी याच कागदपत्रांची मूळ प्रत सादर करावी लागणार आहे.
अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम व चारित्र्याने निष्कलंक असावा. तसेच महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र) नियम 2005 नुसार अर्जदारास दोनपेक्षा जास्त अपत्ये नसणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे वैध जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजाभज, एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना सन 2025-26 या कालावधीसाठी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक राहील. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तहसीलदारांकडून निर्गमित EWS प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे.
सर्व आवश्यक कागदपत्रे व पात्रता निकषांची अर्हता दिनांक 30 जानेवारी 2026 ही अंतिम मानली जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. भरतीसंबंधी अधिक माहिती व ऑनलाईन अर्जासाठी अधिकृत वेबसाईट https://beed.gov.in/ येथे भेट देता येईल.
| PDF जाहिरात (उपविभाग माजलगाव) | https://shorturl.at/fprtV |
| PDF जाहिरात (उपविभाग बीड) | https://shorturl.at/gOYu1 |
| PDF जाहिरात (उपविभाग परळी ) | https://shorturl.at/EwxhA |
| PDF जाहिरात (उपविभाग पाटोदा) | https://shorturl.at/f7Quu |
| PDF जाहिरात (उपविभाग अंबाजोगाई) | https://shorturl.at/k07z0 |
| ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/ikANO |
| अधिकृत वेबसाईट | https://beed.gov.in/ |
