Nashik Anganwadi Bharti 2026 | १२ वी पास महिलांसाठी मोठी संधी! ३१ जुलैपर्यंत अर्ज; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

नाशिक जिल्ह्यातील १२ वी उत्तीर्ण महिलांसाठी नोकरीची चांगली संधी (Nashik Anganwadi Bharti 2026) उपलब्ध झाली आहे. महिला व बाल विकास विभागांतर्गत नाशिक अंगणवाडीमध्ये अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण २४ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावयाचा असून, इच्छुक व पात्र उमेदवारांनी निर्धारित मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ आहे.

या भरतीमध्ये अंगणवाडी मदतनीस पदासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता ही संबंधित पदाच्या अटींनुसार निश्चित करण्यात आली असून, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. तसेच या भरतीसाठी उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे.

भरतीची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे : Nashik Anganwadi Bharti 2026

बाबमाहिती
भरती संस्थानाशिक अंगणवाडी
पदाचे नावअंगणवाडी मदतनीस
पदसंख्या२४
नोकरीचे ठिकाणनाशिक
अर्ज पद्धतऑफलाइन
वयोमर्यादा१८ ते ३५ वर्षे
अर्ज करण्याची अंतिम तारीख३१ जुलै २०२६

या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन स्वरूपात सादर करावा लागणार आहे. अर्ज निर्धारित नमुन्यात पूर्णपणे भरून आवश्यक कागदपत्रांच्या प्रतींसह खालील पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.

हे वाचा : ICSIL Bharti 2026 | सरकारी नोकरीची संधी! ICSIL अंतर्गत भरती; २ ऑगस्टपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

PNB Bharti 2026| बँकेत नोकरीची मोठी संधी! पंजाब नॅशनल बँकेत भरती; 9 ऑगस्टपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), जि. नाशिक यांचे कार्यालय, सिल्वरमुन, फ्लॅट नं.-१, ड्रिमसिटीजवळ, सहकारनगर, रामदास स्वामी मार्ग, नाशिक – ४२२००६.

उमेदवारांनी अर्ज भरताना सर्व माहिती अचूक आणि संपूर्ण नमूद करावी. अर्जामध्ये कोणतीही माहिती अपूर्ण असल्यास संबंधित अर्ज अपात्र ठरविण्यात येऊ शकतो. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या स्वाक्षरीत प्रती जोडणे बंधनकारक आहे.

अर्ज निश्चित मुदतीपूर्वी संबंधित कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे. अंतिम तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

भरतीसंदर्भातील शैक्षणिक पात्रता, अटी, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया आणि इतर सर्व तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात अवश्य वाचावी. तसेच अधिक माहितीसाठी नाशिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

 PDF जाहिरात-1https://lnk.ua/9jvC8JC5k
 PDF जाहिरात-2https://lnk.ua/TVrRXFAAy
अधिकृत वेबसाईटhttps://nashik.gov.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा