Amazon Jobs 2026 | Amazon मध्ये 1.60 लाखांहून अधिक हंगामी रोजगाराच्या संधी; 400 हून अधिक शहरांमध्ये भरती, अर्ज कसा करायचा जाणून घ्या

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

आगामी सणासुदीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर(Amazon Jobs 2026)ने देशभरातील आपल्या ऑपरेशन्स नेटवर्कमध्ये 1,60,000 हून अधिक हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण केल्याची घोषणा केली आहे. ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स व्यवसायातील वाढती मागणी लक्षात घेऊन या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या संधी भारतातील 400 हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध असून, त्यामध्ये मोठ्या महानगरांसोबतच द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांचाही समावेश आहे. Amazon च्या ऑपरेशन्स नेटवर्कमध्ये ग्राहकांच्या ऑर्डर्सचे पिक-अप, पॅकिंग, शिपिंग आणि डिलिव्हरी यासारख्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. सणासुदीच्या काळातील वाढती ऑर्डर संख्या लक्षात घेऊन नवीन कर्मचाऱ्यांना या नेटवर्कमध्ये सहभागी करून घेतले जात आहे.

Amazon ने दिलेल्या माहितीनुसार, या भरतीमधून हजारो महिला आणि दिव्यांग व्यक्तींनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कंपनीने यातील बहुतांश कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या तयारीपूर्वीच ऑनबोर्ड करण्यास सुरुवात केली असून, त्यांना आवश्यक प्रशिक्षणही दिले जात आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सणासुदीचा काळ कोणत्याही अडथळ्याविना हाताळण्यासाठी या विस्तारित कर्मचारीवर्गामुळे Amazon ची फुलफिलमेंट आणि लॉजिस्टिक्स क्षमता आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.

Amazon मधील रोजगाराच्या संधी : Amazon Jobs 2026

माहितीतपशील
रोजगाराच्या संधी1,60,000 पेक्षा जास्त
शहरांची संख्या400 पेक्षा जास्त
रोजगाराचा प्रकारहंगामी रोजगारासह विविध पदे
क्षेत्रई-कॉमर्स, क्विक कॉमर्स, ऑपरेशन्स, लॉजिस्टिक्स आदी
रोजगाराचे ठिकाणभारतातील विविध शहरे आणि राज्ये
अर्जAmazon Jobs च्या माध्यमातून

हेही वाचा : DY Patil Institute of Technology Pune Bharti 2026 | डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत 168 पदांची भरती; 23 सप्टेंबरला थेट मुलाखत

ZP Beed Bharti 2026 | जिल्हा परिषद बीड अंतर्गत 26 पदांची भरती; विधिज्ञ पदासाठी ऑफलाइन अर्जाची संधी

Amazon च्या ऑपरेशन्स नेटवर्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि सर्वसमावेशक कार्यस्थळ उपलब्ध करून देण्यावर कंपनीचा भर असल्याचे सांगण्यात आले आहे. लागू कायद्यानुसार पात्र कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF, कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजे ESIC आणि ग्रॅच्युइटीसारखे सामाजिक सुरक्षा लाभ मिळू शकतात. याशिवाय Amazon च्या सुविधांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, कॅफेटेरिया आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याचे कंपनीने म्हटले आहे. फुलफिलमेंट सेंटर्समध्ये प्रथमोपचारासाठी ऑनसाईट वैद्यकीय सुविधा म्हणजेच Amcare देखील उपलब्ध आहे.

कंपनीच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस काम आणि दरमहा आठवड्यातून दोन दिवस सुट्टी मिळते. लागू नियमांनुसार अनिवार्य सुट्ट्या, ऐच्छिक सुट्ट्या, वार्षिक रजा, आजारपणाची रजा आणि कॅज्युअल लीव्ह यांसारख्या सुविधाही उपलब्ध आहेत. पात्र कर्मचाऱ्यांसाठी Early Access to Pay म्हणजे EATP या उपक्रमांतर्गत महिन्याच्या 1 ते 20 तारखेदरम्यान उर्वरित बेसिक पगाराच्या 80 टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची सुविधा असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

Amazon च्या लॉजिस्टिक्स नेटवर्कमधील डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी ‘सन्मान’ या कल्याणकारी उपक्रमाचीही माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, सरकारी लाभ आणि आर्थिक समावेशनाच्या सुविधा, विमा संरक्षण तसेच रस्ते सुरक्षेशी संबंधित उपाययोजनांचा समावेश आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना ग्रुप मेडिक्लेम आणि ग्रुप पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्सचे संरक्षणही उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.

Amazon चे भारतातील नेटवर्क मोठ्या प्रमाणावर विस्तारलेले आहे. कंपनीकडे 15 राज्यांमध्ये फुलफिलमेंट सेंटर्स असून त्यामध्ये 43 दशलक्ष घनफूटपेक्षा जास्त स्टोरेजची क्षमता आहे. तसेच 19 राज्यांमध्ये सॉर्टेशन सेंटर्स आणि जवळपास 2,000 Amazon-संचालित आणि पार्टनर डिलिव्हरी स्टेशन्सचे नेटवर्क आहे. याशिवाय 28,000 हब डिलिव्हरी सहयोगी आणि हजारो Amazon Flex पार्टनर्स देशभरातील ग्राहकांपर्यंत डिलिव्हरी करण्यासाठी कार्यरत आहेत. Amazon चे नेटवर्क 17 लाखांहून अधिक विक्रेत्यांना देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत करत असल्याचे माहितीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

पदवीधर उमेदवारांसाठीही विविध संधी

Amazon मध्ये प्रशासकीय समर्थन, Amazon Design, ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटोग्राफी उत्पादन, Business Intelligence, खरेदी, नियोजन, Instock Management, ग्राहक सेवा, Data Science, Database Administration, Economics, Editorial, Writing, Content Management, Facilities, Maintenance, Real Estate, HR यांसह विविध विभागांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. Amazon Audible मध्ये ऑडिओबुक आणि पॉडकास्टशी संबंधित कामांसाठीही भरतीच्या संधी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Content Associate सारख्या पदांसाठी कोणतीही पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. संबंधित कामासाठी Content Writing चा अनुभव, Proofreading, Copy Editing आणि Fact-Checkingचा किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे. Microsoft Word, Excel आणि Database Conceptsची माहिती तसेच सोशल मीडिया, Google, Goodreads, SEO आणि Web-Based Research Toolsची माहिती असणे अपेक्षित आहे. ऑनलाइन पुस्तके, पॉडकास्ट, वेबसाइट, ब्लॉग आणि डिजिटल कंटेंटमधील मूलभूत गोष्टी व ट्रेंडची माहितीही आवश्यक असू शकते.

या पदांमध्ये Amazon Audible च्या विविध उत्पादनांची माहिती लिहिणे, उत्पादनाच्या वर्णनातील तथ्यांची पडताळणी करणे आणि माहितीचे Proofreading करणे यांसारख्या जबाबदाऱ्या असू शकतात. उत्पादनाची किंमत, विक्रीची तारीख, प्रादेशिक हक्क, रॉयल्टी कमावणारा आणि संबंधित Amazon ASIN कोड यांसारख्या माहितीचा आढावाही घ्यावा लागू शकतो.

याशिवाय Device Associate सारख्या पदांसाठी BE IT, ECE, EEE, BTech, BSc किंवा विज्ञान आणि अभियांत्रिकीशी संबंधित पदवी आवश्यक असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे. Windows Operating System, Word, Excel आणि इंटरनेटशी संबंधित प्रोग्राम्सची माहिती, तांत्रिक कौशल्य, डेडलाइन पूर्ण करण्याची क्षमता आणि इंग्रजी भाषेचे व्याकरण, वाक्यरचना व शब्दसंग्रह यांचे ज्ञान आवश्यक असू शकते. या पदावर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची चाचणी, गुणवत्ता तपासणी, त्रुटींची नोंद, डेटा संकलन, प्रगतीचा अहवाल आणि समस्यांचे कम्युनिकेशन यांसारखी कामे असू शकतात.

Amazon Jobs साठी अर्ज कसा करायचा?

इच्छुक उमेदवार Amazon च्या अधिकृत Jobs पेजवर जाऊन उपलब्ध पदांची माहिती तपासून संबंधित पदासाठी अर्ज करू शकतात. दिलेल्या माहितीनुसार विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि कामाचे ठिकाण वेगवेगळे असू शकते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची पात्रता आणि Job Description काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. उपलब्ध माहितीनुसार Chennai, Tamil Nadu, Bengaluru यांसह भारतातील विविध राज्ये आणि शहरांमध्ये संधी उपलब्ध होऊ शकतात.

टीप: वरील माहितीमध्ये 1,60,000 हून अधिक हंगामी रोजगाराच्या संधींसोबत Amazon मधील विविध विभागांतील पदांची माहिती देण्यात आली आहे. मात्र प्रत्येक पदासाठी पदनिहाय रिक्त जागा, पात्रता आणि अर्जाची अंतिम तारीख वेगळी असू शकते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित Amazon Jobs जाहिरात तपासणे आवश्यक आहे

How to Apply For Amazon Content Associate Bharti 

  • तुम्ही Amazon Jobs पेजवर जाऊन किंवा https://bit.ly/3ddjGzT या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता.

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा