खुशखबर: राज्यात १५,६३१ पोलिस शिपाई भरती; वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी | Maharashtra Police Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Maharashtra Police Bharti 2025: राज्य सरकारने पोलिस दलात तब्बल १५,६३१ पोलिस शिपाई पदांची मेगा भरती जाहीर केली आहे. राज्याच्या रक्षणासाठी, समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था बळकट करण्यासाठी ही मोठी भरती होत आहे. प्रशिक्षण व खास पथकांचे अपर पोलिस महासंचालक कार्यालयाने या भरतीसाठी सेवा पुरवठादार कंपनी निश्चित केली असून, २५ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

या भरतीतून सोलापूर शहर, ग्रामीण पोलिस, एसआरपीएफ क्र.१० आणि कारागृह विभाग यामध्ये २२५ पदे भरली जाणार आहेत. पुणे, मुंबई, नाशिकसारख्या शहरी भागात पदांची संख्या जास्त असणार आहे.

वयोमर्यादा ओलांडलेल्यांसाठी विशेष सवलत – Maharashtra Police Bharti 2025

सन २०२२ आणि २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकदाच विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे वयमर्यादेमुळे मागील दोन वर्षांत भरतीसाठी अपात्र ठरलेले अनेक तरुण-तरुणींनाही अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. २०२२ ते २०२५ या काळात पोलिस भरती झाली नसल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पात्रता व पदांची माहिती

  • पदे : पोलिस शिपाई व वाहनचालक
  • शैक्षणिक पात्रता : किमान बारावी उत्तीर्ण
  • भरती जिल्हास्तरावर राबवली जाणार असल्याने राज्यभरातील उमेदवारांना संधी उपलब्ध होणार आहे.

भरती प्रक्रिया

  • उमेदवारांना प्रथम अर्ज नोंदणी करावी लागेल.
  • त्यानंतर शारीरिक चाचणी (५० गुणांची) होईल.
  • प्रत्येक पदासाठी शारीरिक चाचणीनंतर १० उमेदवारांची निवड केली जाईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा होईल.
  • शारीरिक आणि लेखी परीक्षेनंतर गुणवत्तेनुसार यादी तयार होईल.
  • अखेरीस कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येईल.

तरुणांमध्ये उत्साह

या भरतीमुळे राज्यातील हजारो तरुण-तरुणींना पोलिस खात्यात नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांनी आधीच तयारीला सुरुवात केली आहे. बारावी उत्तीर्णांसह विविध शाखांतील पदवीधर विद्यार्थ्यांनीही या भरतीकडे मोठ्या उत्सुकतेने लक्ष केंद्रित केले आहे.


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा