खुशखबरः MSRTC एसटी महामंडळात 434 पदांची भरती; त्वरित अर्ज करा | MSRTC Recruitment 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

MSRTC Recruitment 2025: राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात शिकाऊ उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. विभागात विविध कार्यशाळा व्यवसायांतर्गत तब्बल ४३४ रिक्त पदांवर मेगा भरती होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

या भरतीसाठी उमेदवारांनी दोन टप्प्यांत अर्ज करणे बंधनकारक आहे. प्रथम ऑनलाईन अर्ज www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर सादर करावा लागणार असून, त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह नमुना ऑफलाईन अर्ज रत्नागिरी एसटी विभाग कार्यालयात ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत जमा करणे गरजेचे आहे.

शिकाऊ उमेदवारीसाठी प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे. तसेच भरती प्रक्रिया स्थगित करणे, रद्द करणे, रिक्त जागांची संख्या कमी-जास्त करणे किंवा आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार विभाग नियंत्रकांकडेच राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

भरतीतील पदे पुढीलप्रमाणे : MSRTC Recruitment 2025

  • यांत्रिक डिझेल – ११०
  • यांत्रिक मोटारगाडी – ११०
  • बीजतंत्री – ६०
  • पत्राकारागीर – ४४
  • सांधाता – २५
  • कातारी – १०
  • यंत्र कारागीर – १०
  • रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग – ५
  • साठा जोडारी – ४४
  • सुतार – ४
  • रंगारी – १०
  • शिवणकाम – २

या भरतीमुळे रत्नागिरी विभागातील तरुणांना रोजगार व प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा