IBPS RRB Bharti 2025 : ग्रामीण बँकांमध्ये तब्बल 13 हजारांहून अधिक पदांची मोठी भरती जाहीर

IBPS RRB Bharti 2025: बँकिंग पर्सनल सिलेक्शन इन्स्टिट्यूटने (IBPS) ग्रामीण भागातील तरुणांसाठी सुवर्णसंधीची घोषणा केली आहे. IBPS ने ३१ ऑगस्ट २०२५ रोजी बहुप्रतिक्षित IBPS RRB Notification 2025 जाहीर केली असून १ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. देशभरातील प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये १३,२९४ रिक्त पदांसाठी ही मोठी भरती होणार आहे. ग्रामीण भागात सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती म्हणजे एक मोठे आकर्षण ठरणार आहे.

भरतीतील प्रमुख पदे – IBPS RRB Bharti 2025

IBPS RRB 2025 अंतर्गत उमेदवारांना खालील पदांसाठी संधी मिळणार आहे :

  • ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) – ७९७२ पदे
  • ऑफिसर स्केल-I (सहाय्यक व्यवस्थापक) – ३९०७ पदे
  • ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) – ५० पदे
  • ऑफिसर स्केल-II (कायदा) – ४८ पदे
  • ऑफिसर स्केल-II (सीए) – ६९ पदे
  • ऑफिसर स्केल-II (आयटी) – ८७ पदे
  • ऑफिसर स्केल-II (सामान्य बँकिंग अधिकारी) – ८५४ पदे
  • ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – १५ पदे
  • ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – १६ पदे
  • ऑफिसर स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) – १९९ पदे

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. पदवी किंवा संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात नीट वाचून पात्रता तपासणे गरजेचे आहे.

अर्ज फी

  • खुला प्रवर्ग : रु. 850/-
  • राखीव प्रवर्ग : रु. 175/-

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू : १ सप्टेंबर २०२५
  • अर्जाची अंतिम तारीख : २१ सप्टेंबर २०२५
  • प्रिलिम परीक्षा (ऑफिसर्स/ऑफिस असिस्टंट) : नोव्हेंबर – डिसेंबर २०२५
  • प्रिलिम निकाल : डिसेंबर २०२५ – जानेवारी २०२६
  • मुख्य परीक्षा : डिसेंबर २०२५ – फेब्रुवारी २०२६
  • इंटरव्ह्यू (अधिकाऱ्यांसाठी) : जानेवारी – फेब्रुवारी २०२६

निवड प्रक्रिया

  • ऑफिसर स्केल-I : प्रिलिम परीक्षा + मुख्य परीक्षा + मुलाखत
  • ऑफिस असिस्टंट : प्रिलिम परीक्षा + मुख्य परीक्षा
  • ऑफिसर स्केल-II व III : लिखित परीक्षा + मुलाखत

परीक्षा पद्धती

प्रिलिम परीक्षा (ऑफिस असिस्टंट व ऑफिसर स्केल-I साठी)

  • रिझनिंग – ४० प्रश्न, ४० गुण
  • न्यूमेरिकल अॅबिलिटी/क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – ४० प्रश्न, ४० गुण
  • एकूण – ८० प्रश्न, ८० गुण (वेळ – ४५ मिनिटे)

मुख्य परीक्षा

  • रिझनिंग
  • कॉम्प्युटर नॉलेज
  • जनरल अवेअरनेस
  • इंग्रजी/हिंदी भाषा
  • न्यूमेरिकल अॅबिलिटी/क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड
    (एकूण २०० प्रश्न, २०० गुण – वेळ २ तास)

ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी मोठी संधी

IBPS RRB ही परीक्षा दरवर्षी लाखो उमेदवारांना आकर्षित करते. ग्रामीण बँकांमध्ये अधिकारी व सहाय्यक पदांवर काम करण्याची संधी मिळाल्याने उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात स्थिर करिअर घडवता येते. विशेष म्हणजे या भरतीतून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यासही हातभार लागणार आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.ibps.in वर जाऊन नोंदणी करावी. ग्रामीण बँकांमध्ये नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी गमावू नका.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/DZgqL
ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/dJ57R
अधिकृत वेबसाईटwww.ibps.in