SEBI Bharti 2025: भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) यांनी 2025 साठी मोठी भरती जाहीर केली असून अधिकारी (सहाय्यक व्यवस्थापक) या पदांच्या 110 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. विविध स्ट्रिममध्ये ही भरती होत असून, इच्छुक उमेदवारांनी 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. शेअर बाजार नियमन करणाऱ्या या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची ही सुवर्णसंधी मानली जात आहे.
या भरतीमध्ये जनरल, लीगल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रिसर्च, ऑफिशियल लँग्वेज, इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल) अशा सात स्ट्रिमचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक 56 जागा जनरल स्ट्रिमसाठी, तर IT मध्ये 22, लीगल स्ट्रिममध्ये 20 जागा आहेत. इलेक्ट्रिकल व सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी अनुक्रमे 2 आणि 3 जागा उपलब्ध आहेत.
अर्जदारांकडून पदानुसार वेगवेगळ्या पात्रता अपेक्षित आहेत. जनरल स्ट्रिमसाठी पदवी, LLB, BE/B.Tech किंवा मास्टर्स पदवी चालते, तर लीगल स्ट्रिमसाठी LLB अनिवार्य आहे. IT स्ट्रिमसाठी BE/B.Tech किंवा संबंधित पदवी आवश्यक आहे. रिसर्च आणि ऑफिशियल लँग्वेज स्ट्रिमसाठी मास्टर्स पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा मान्य आहे. वयोमर्यादा 30 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.
वेतनश्रेणीही आकर्षक असून, सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी दरमहा ₹62,500 ते ₹1,26,100 इतके वेतन मिळणार आहे. अर्ज शुल्कामध्ये SC/ST/PwBD उमेदवारांसाठी ₹100, तर सामान्य, इतर मागास आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी ₹1000 शुल्क आकारले जाणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरील sebi.gov.in या ठिकाणी दिलेली नोटिफिकेशन नीट वाचून, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून नमूद केलेल्या लिंकवर अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी आणि सर्व अटी-शर्तींसाठी SEBI च्या PDF जाहिरातीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
SEBI Bharti 2025
| PDF जाहिरात | https://shorturl.at/z1ScD |
| ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/HtxDI |
| अधिकृत वेबसाईट | https://www.sebi.gov.in/ |
