पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 434 पदांची मेगा भरती स्थगित; नवीन परिपत्रक जाहीर, जाणून घ्या भरती कधी होणार | PDCC Bank Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

PDCC Bank Bharti 2025: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना

PDCC Bank Bharti 2025: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांनी 434 लेखनिक पदांची 08.11.2024 रोजी जारी केलेली जाहिरात सकाळ वर्तमानपत्र व बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीअन्वये उमेदवारांना 01.12.2024 ते 20.12.2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची परवानगी देण्यात आली होती.

दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमास माननीय राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे आचारसंहितेच्या कालावधीत कोणतेही ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे सदर भरती प्रक्रियेतील संबंधित टप्पे सध्या स्थगित ठेवण्यात येत आहेत.

भरती प्रक्रियेबाबतचे पुढील कार्यक्रम व सुधारित तारखा वेळोवेळी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरील माहिती नियमित तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित (PDCC Bank) अंतर्गत लेखनिक पदांच्या 434 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज 1 डिसेंबर 2025 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता पदानुसार बदलू शकते, त्यामुळे उमेदवारांनी मूळ जाहिरात तपासणे आवश्यक आहे. ही भरती पुणे जिल्ह्यातील शाखांसाठी असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बँकेची अधिकृत वेबसाइट pdcc.bank.in येथे भेट द्यावी.

भरतीचा तपशील

भरतीमाहिती
भरती संस्थापुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
पदाचे नावलेखनिक
एकूण पदसंख्या434
शैक्षणिक पात्रतापदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात पहावी)
नोकरी ठिकाणपुणे
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख1 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख20 डिसेंबर 2025
अधिकृत वेबसाईटhttps://pdcc.bank.in/
PDF जाहिरातhttps://shorturl.at/I9M6W
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/I9Moy
अधिकृत वेबसाईटhttps://pdcc.bank.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा