Nashik Fire Brigade Bharti 2025: नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागात चालक आणि फायरमन या पदांसाठी एकूण 186 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2025 आहे.
या भरतीत चालक 36 जागा आणि फायरमन 150 जागा उपलब्ध आहेत. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून, मुंबई येथील राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा 6 महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. चालक पदासाठी किमान 3 वर्षांचा अनुभव आणि वैध जड वाहन चालविण्याचा परवाना बंधनकारक आहे.
अर्जकर्ता मराठी भाषेचे ज्ञान (वाचन, लेखन, संभाषण) असणे गरजेचे आहे. खुल्या प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ₹1000 तर मागास प्रवर्गासाठी ₹900 निश्चित करण्यात आले आहे. वेतनश्रेणी S-6 आणि S-7 प्रमाणे रु. 19,900 ते 69,100 दरम्यान राहणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
अर्ज केवळ नाशिक महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (nmc.gov.in) ऑनलाइन सादर करावेत. अधिक माहितीसाठी जारी केलेली PDF जाहिरात पाहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
रिक्त पदांचे तपशील – Nashik Fire Brigade Bharti 2025
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| चालक | 36 |
| फायरमन | 150 |
| एकूण | 186 |
शैक्षणिक पात्रता
चालक
- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
- राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई – 6 महिने अभ्यासक्रम (प्राधान्य)
- वाहनचालक म्हणून किमान 3 वर्षांचा अनुभव
- वैध जड वाहन चालविण्याचा परवाना
- मराठी भाषेचे ज्ञान (वाचणे, लिहिणे, बोलणे)
फायरमन
- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
- राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई – 6 महिने अभ्यासक्रम (अनिवार्य)
- मराठी भाषेचे ज्ञान
वेतनश्रेणी
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
|---|---|
| चालक | S-7 ₹21,700 – ₹69,100 |
| फायरमन | S-6 ₹19,900 – ₹63,200 |
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 डिसेंबर 2025
अर्ज कसा करावा?
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावेत
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा
- शेवटच्या तारखेच्या आत ऑनलाइन अर्ज सादर करावा
- अधिकृत वेबसाईट: https://www.nmc.gov.in/
| शुद्धिपत्रक | https://shorturl.at/oaobM |
| PDF जाहिरात | https://shorturl.at/wuVEb |
| ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/ycbft |
| अधिकृत वेबसाईट | https://www.nmc.gov.in/ |
