Kolhapur Jobs 2025: सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये विविध पदांसाठी भरती; वॉक-इन मुलाखतीसाठी हजर राहा | Sarojini College of Pharmacy Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

Sarojini College of Pharmacy Bharti 2025: आर. एल. तावडे फाऊंडेशनच्या सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी (B. Pharmacy – Non-Grantable), राजेंद्रनगर, कोल्हापूर येथे विविध अध्यापन पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयात प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक अशा एकूण 16 पदांची भरती केली जाणार आहे.

महाविद्यालयाने यासाठी वॉक-इन इंटरव्ह्यूची घोषणा केली असून ही मुलाखत 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत महाविद्यालयातच आयोजित करण्यात आली आहे.

Sarojini College of Pharmacy Bharti 2025

प्राचार्य पदासाठी एक जागा – अनारक्षित

महाविद्यालयात प्राचार्य पदाची एक जागा उपलब्ध असून ती ओपन कॅटेगरीसाठी राखीव आहे. योग्य शैक्षणिक पात्रता व अनुभव असलेले उमेदवार थेट मुलाखतीस हजर राहू शकतात.

प्राध्यापक (Professor) –3 जागा

खालील विषयांमध्ये प्रत्येकी एक जागा मंजूर आहे :

  • Pharmaceutics – 1 (Open)
  • Pharmaceutical Chemistry – 1 (Open)
  • Pharmacology – 1 (Open)

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – 5 जागा

या वर्गात एकूण 5 पदे रिक्त असून सर्व पदे ओपन कॅटेगरीसाठीच आहेत :

  • Pharmaceutics – 1
  • Pharmaceutical Chemistry – 1
  • Pharmaceutical Analysis – 1
  • Pharmacology – 1
  • Pharmacy Practice – 1

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – 7 जागा

या पदांमध्ये काही जागा आरक्षण प्रवर्गानुसार राखीव आहेत.

विषयजागाप्रवर्ग
Pharmaceutics1SEBC
Pharmaceutical Chemistry (2)1 Open, 1 VJNT-AVJNT-A
Pharmacology (2)1 SEBC, 1 SCSEBC/SC
Pharmacognosy (2)1 SC, 1 OpenSC/Open

शैक्षणिक पात्रता आणि नियम

शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि पगाराचे मानधन PCI व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या नियमांप्रमाणे राहणार आहे.

अर्जदारांनी पूर्ण केलेला बायोडेटा तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच ज्या उमेदवारांना आधीच कागदपत्रे पाठवायची असतील त्यांनी ती scop.management24@gmail.com या ईमेलवर पाठवावीत.

मुलाखतीचे ठिकाण

सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, आर. एस. क्र. 576, राजेंद्रनगर वॉटर टँकजवळ, राजेंद्रनगर, कोल्हापूर

जाहिरातीची तारीख : 28नोव्हेंबर 2025


ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा