भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन (GIC) मुंबईत 20 जागांसाठी भरती; अर्ज करण्याची आज शेवटची संधी | General Insurance Corporation of India Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

General Insurance Corporation of India Bharti 2025: भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन (GIC) अंतर्गत ‘अ‍ॅक्चुरियल अप्रेंटिस’ या पदासाठी 20 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.

GIC ने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅक्चुरियल अप्रेंटिस पदासाठी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण आवश्यक असून उमेदवारांचे वय 21 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून होणार असून निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहिना 40,000 ते 45,000 रुपये मानधन मिळणार आहे. ही नियुक्ती मुंबई येथे होणार आहे.

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 

इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आपली पात्रता तपासावी तसेच बायोडेटा नमूद केलेल्या ई-मेलवर पाठवणे आवश्यक आहे. अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट आणि उपलब्ध PDF जाहिरात पाहण्याचे आवाहन GIC तर्फे करण्यात आले आहे.

General Insurance Corporation of India Bharti 2025

पदाचे नावपदसंख्या
अ‍ॅक्चुरियल अप्रेंटिस20

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावपात्रता
अ‍ॅक्चुरियल अप्रेंटिसGraduation किंवा Post Graduation (मान्यताप्राप्त विद्यापीठातून)

वेतनश्रेणी

पदाचे नाववेतन
अ‍ॅक्चुरियल अप्रेंटिस40,000 – 45,000 रुपये प्रतिमहिना
PDF जाहिरातhttps://shorturl.at/KjA9T
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/So1B3
अधिकृत वेबसाईटhttps://www.gicre.in/en/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा